
कष्टकऱ्यांचे 'लाल वादळ' मुंबईच्या दिशेने, किसान सभेचा मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा; २ फेब्रुवारीला मुंबईत धडकणार (फोटो सौजन्य - Gemini)
नाशिक : आदिवासी कष्टकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तीन दिवसापूर्वी सुरगाणा तालुक्यातून निघालेले भारतीय किसान सभा आणि माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लाल वादळ रविवारी नाशिकमधून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले.
हातात लाल झेंडा आणि मागण्यांचे फलक घेवून पायी निघालेल्या सुमारे २० हजार मोर्चेकऱ्यांनी रविवारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २० मिनिटे विश्रांती घेतली. या वेळी मागण्या झाल्या नाही तर २ फेब्रुवारीला मुंबईत पोहचल्यानंतर मंत्रालयाला घेराव घालू, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला. त्यामुळे शासन आता काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वनहक्क कायद्याची अमंलबजावणी करावी, वनजमीन, गायरान धारकांना स्वतंत्र सातबारा उतारा मिळावा, शिक्षणाचे खासगीकरण थांबवा, पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी स्थानिकांना द्या या प्रमुख मागण्यांसाठी लाल वादळ रस्त्यावर उतरले आहे. मोर्चात माजी आमदार जे. पी. गावित, किसान सभेचे नेते अजित नवले, डॉ. डी. एल. कराड, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मंदाकिनी भोये, राजू देसले आदी सहभागी झाले आहे.
दिंडोरी, पेठ व सुरगाणा येथून पायी निघालेले हजारो मोर्चेकरी शनिवारी म्हसरुळ परिसरात दाखल झाले होते. त्यानंतर रविवारी सकाळी मोर्चाला सुरुवात झाली. शिस्तबध्द पध्दतीने पायी चालत निघालेले मोर्चेकरी आरटीओ कॉर्नर, निमाणी बस स्टॅण्ड, अशोक स्तंभमार्गे दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचले. यावेळी पोलिस प्रशासनाने त्यांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध दाधिकारी करून कार्यालयासमोरील विश्रांतीनंतर मोर्चा लाल सलाम, जिंदाबाद जिंदाबाद, लडेंगे जिंतेंगे, कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’ अशा घोषणा देत सीबीएस, गडकरी चौक, मुंबई नका मार्गे मुंबईकडे मार्गस्थ झाला, रविवारचा मुक्काम हा राजूर बहुला येथे होणार असून, सोमवारी पुन्हा लाल वादळ मुंबईकडे निघेल.
किसान सभेच्या या मोर्चामध्ये सुमारे वीस हजार आदिवासी सहभागी झाले आहे. मोचांची भव्यता बघता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रविवारी वाहतूक मार्गात बदल केला होता. पंचवटी कारंजाकडून रविवार कारंजा आणि सीबीएसकडे जाणारा रस्ता बंद करून रविवार कारंजाहुन वाहतूक शालिमारकडे वळविण्यात आली होती. तसेच अशोक स्तभकडून सीभीएसकडे जाणारी वाहतूक गंगापूर रोड मार्गे वळविण्यात आली होती.
सीबीएस येसून मोर्चा निघाल्यानंतर मीचंचे पहिले टोक है गडकरी बौकाच्या पुढे तर शेवटचे टोक अशोकस्तंभध्या मागे होते. त्यामुळे सीबीस ते मुंबई नाक्यापर्यंत मोर्चा पोहोचण्यास अर्या तासाहून अधिक कालावधी लागला, सीपर्यंत शिंगाडा तलावाकडून आणि बांडक सर्कलकडून शिंगाडा तलावाकडे जाणारे वाहने रोखून धरल्याने दोन्हीनी बाजुला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही, २०१८, २०१९ व २०२३ मध्ये लॉगमार्च काढले. परंतु केवळ आश्वासने मिळाली, अदयाप एकही मागणी पूर्ण झालेली नाही. पूर्वीचा अनुभव बचता यावेळी आम्ही आरपारची लढाई लढत आहोत, मागण्या मान्य झाल्या तर ठीक, नाही तर मंत्रालयाला घेराव घालू. आता कुठल्याही परिस्थितीत आम्ही माधार घेणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार जे. पी. गावित यांनी दिली.