
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
फॅशन, अभिनय, नृत्य यात कायम वैविध्यपूर्ण कलाकृती साकारणारी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने एक खास घोषणा करून डान्स ड्रामा असलेल्या संभवामी युगे युगे याची ओळख प्रेक्षकांना करून दिली. हा एक डान्स ड्रामा जरी असला तरी कृष्णाची विविध रूप यातून ती साकारणार आहे. तसेच हा डान्स ड्रामा नक्की काय असेल हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अभिनेत्री संस्कृती बालगुडे प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच एक सुंदर मनमोहक लूक आणि नवाकोरा प्रोजेक्ट्स घेऊन येणार असून ” संभवामि युगे युगे ” मध्ये ती श्री कृष्णाच्या अवतारात दिसणार आहे. संभवामि युगे युगे हा एक डान्स ड्रामा असला तरी तो तिच्या जीवाच्या अगदी जवळचा प्रोजेक्ट आहे असं तिने या आधी सांगितलं होत.
भगवान श्री कृष्णाच्या भूमिकेत असलेला संस्कृतीचा लूक प्रेमात पडणारा आहे पण कृष्णाच्या गोष्टी ती या मधून उलगडताना दिसणार आहे. संस्कृती आजवर अनेक मुलाखती मध्ये श्री कृष्णा बद्दलच तिचं असलेल खास नातं यावर बोलताना दिसली आहे.
तिच्या कृष्णरुपी लूकच प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केल्या नंतर आज तिने अजून एक कृष्ण रुपातला मनमोहक फोटो पोस्ट करून त्याला खास कॅप्शन दिलं आहे ती म्हणतेय “मंचावर कृष्णाला साकारण्याची संधी मिळतेय यापेक्षा मोठं भाग्य आणखी काय ? ” आयुष्यात एवढं छान आणि सुंदर पात्र साकारण्याची या निमित्तानं संधी तिला मिळाली असून प्रेक्षकांमध्ये “संभवामि युगे युगे” ची उत्सुकता बघायला मिळतेय.
“संभवामि युगे युगे” च्या निमित्तानं अभिनेत्री संस्कृती बालगुडेची 2 स्वप्न पूर्ण होताना बघायला मिळतात. एक म्हणजे तिचं कृष्ण रुपात येऊन प्रेक्षकांना काहीतरी कमाल अनुभूती देऊन जाणं आणि दुसरं तिच्या स्वप्नवत असलेल्या अभिनेत्यासोबत या प्रोजेक्ट्स साठी काम करणं अभिनेता सुमित राघवन या प्रोजेक्ट मध्ये संस्कृतीच्या कृष्ण रुपासाठी आवाज देणार असल्याचं कळतंय आणि म्हणून हा प्रोजेक्ट तिच्यासाठी अजून जास्त खास आहे.
संस्कृती ने आजवर अनेक कलाकृती मधून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केल्या नंतर आता संस्कृतीचा हा कृष्णरुपी अवतार बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.