
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सध्या मराठी Zee 5 वरील ‘बे दुणे तीन’ ही मालिका चर्चेत आहे. या मालिकेचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये ही मालिका पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली. आणि आज 5 डिसेंबर रोजी ही मालिका झी फाईव्ह रिलीज झाली आहे. या मालिकेमध्ये आधुनिक नातेसंबंधांतील आनंद, गोंधळ आणि जीवनातील छोटे-छोटे अनुभव प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत दीक्षा केतकर, विराजस कुलकर्णी, शुभांकर एकबोटे, क्षितिश दाते, पुष्करराज चिरपुटकर आणि शिवाणी रांगोळे हे सगळे तगडे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले आहेत. परंतु या मालिकेची संपूर्ण कथा अभय आणि नेहा या तरुण जोडप्याभोवती फिरते, ज्यांना अचानक तीन बाळ होणार असल्याचे समजल्यावर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलते.
Dhurandhar रिलीजच्या तोंडावर असताना Ranveer Singh अडचणीत, Kantara वादावरून FIR दाखल
‘बे दुणे तीन’ मालिकेचा रिव्ह्यू
‘बे दुने तीन’ या मालिकेमध्ये शिवानी रांगोळे या अभिनेत्रीने नेहा नावाची भूमिका साकारली आहे. तसेच अभिनेता क्षितिज दातेने अभयची भूमिका साकारली आहे. हे दोघेही जोडपं असून या दोघांनाही समजते की त्यांना तीळ बाळ होणार आहे. या नंतर कथेमध्ये खरा गोंधळ सुरु होतो. वेब सिरीजची सुरुवात अभयच्या घरामधील चार माणसं हरवल्याने होते, यानंतर तो पोलिसांकडे तक्रार करतो. आणि मग पोलीस लगेचच अभयच्या घरी पोहचतात. आणि त्याला संपूर्ण घटनाक्रम सांगण्यास सांगतात. इथून मालिकेच्या संपूर्ण कथेला सुरुवात होते. क्षितिज दाते म्हणजेच अभय पोलिसांना संपूर्ण माहिती देतो. तसेच पोलिसांना एक नाही तर चार माणसं हरवली आहेत असे सांगतो. यानंतर पोलिसांना समजते की ती चार माणसं नसून, एक गरोदर बाई आणि तिच्या पोटात असलेली तीन बाळ यांच्याबद्दल अभय बोलत आहे.
‘बे दुने तीन’ या मालिकेमधील ही अनोखी गंमत पोलिसांना समजल्यावर खरी मज्या सुरु होते. नेहा आणि अभय यांच्या मधील तीळ होण्याचा आनंद, डोक्याला आलेला ताण वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि आदर्श पालकत्व सांभाळण्यासाठी त्यांची सुरु झालेली मेहनत, हे सगळं या सिरिज मध्ये दिसणार आहे. आता नेमकं नेहा खरचं तीन बाळांना घेऊन हरवली आहे का? तसेच, नेहा आणि अभय या तीन बाळाच्या बातमीने खुश आहेत का? हे जोडपं पालकत्वाची जबाबदारी पूर्णपणे पार पडतील का? याच बरोबर हे सगळं सांभाळताना या दोघांना काय अडचणी आल्या? या सगळ्याचा प्रवास वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. जे सगळं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच समजणार आहे.
‘वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न…’ मलायका अरोराने Ex पती अरबाज खानचे नाव न घेता साधला निशाणा!
या मालिकेचे दिग्दर्शन अथर्व सौंदणकर आणि हिमांशू पिले यांनी केले असून वृषांक प्रॉडक्शन्स यांनी निर्मिती केली आहे. जिव्हाळा, विनोद आणि वास्तववाद एकत्र करणारी एक ताजी, संबंधित कथा या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘बे दुणे तीन’ मध्ये प्रभावशाली अभिनय आणि मनाला भिडणारी कथा आहे आणि जोडप्यांशी आणि कुटुंबांशी खोलवर जुळण्याची खात्री देते. तसेच यामध्ये, वैवाहिक आयुष्यातील बदलत्या परिस्थिती आणि यात जवळ येऊन जपलेल्या पालकत्वाचे चित्रण करण्यासाठी फारच कलात्मकरीत्या विनोद, भावना आणि सत्यता एकत्र गुंफल्या गेल्या आहेत. ‘बे दुणे तीन’ संघर्ष, संबंध आणि स्वतःबाबतच्या जाणीवेतील क्षणांद्वारे आयुष्याचे जोडीदार आणि पालक म्हणून एकत्र पुढे जाण्याच्या गोड-तिखट प्रवासावर सुंदरपणे प्रवास आहे.