(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मलायका अरोराने १९९८ मध्ये अरबाज खानशी लग्न केले, परंतु २०१८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती, आणि नंतर अरबाज खानने शुरा खानशी दुसरे लग्न केले. अलिकडेच मलायकाने घटस्फोट आणि अफेअर्सच्या बाबतीत महिलांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अरबाज खानचे नाव न घेता, तिने तरुण महिलांशी लग्न करणाऱ्या पुरुषांबद्दल आपले मत मांडले आहे. अलिकडेच, मलायकानं घटस्फोट आणि अफेअर्सच्या मुद्द्यावर महिलांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, मलायका अरोराने थेट Ex पती अरबाज खानवर निशाणा साधला आहे.
मोजो स्टोरीसाठी बरखा दत्तशी बोलताना मलायका अरोरा म्हणाली, “तुम्ही नेहमीच बलवान आहात म्हणून तुमचं मूल्यांकन केलं जातं. आम्हाला नेहमीच असं मत मिळत राहील. मला पुरुषांबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे, कारण माझ्या आयुष्यात काही पुरुष खूप महत्वाचे आणि अद्भुत राहिले आहेत….”
आपली संस्कृती, आपला इतिहास! ‘असुरवन’ चित्रपटातून आदिवासी वारली संस्कृतीचे दर्शन, दिग्दर्शक म्हणतात…
वयाने लहान असलेल्या तरुणीशी लग्न करणं… : मलायका अरोरा
मलायका अरोरा पुढे म्हणाली, “आज जर एखाद्या पुरूषानं पुढे जाण्याचा, घटस्फोट घेण्याचा आणि त्याच्या अर्ध्या वयाच्या महिलेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तर ते म्हणजे, व्वा, काय पुरूष आहे… पण जेव्हा एखादी स्त्री असंच करते, तेव्हा तिला प्रश्न विचारले जातात की, ती असं का करतेय? तिला समजत नाही का? रूढीवादी विचार कायम आहेत…”
मलायकाला आईनं दिलेला लाखमोलाचा सल्ला
मलायकाने पुढे स्पष्ट केले की, जेव्हा तिने २५ व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या आईला धक्का बसला. ती म्हणाली, “माझी आई नेहमी म्हणायची, ‘बाहेर जा, आयुष्याचा आनंद घे, आणि कृपया ज्याला तू पहिल्यांदा डेट करतेस त्याच्याशी लग्न करू नकोस,’ आणि मी तेच केले. मी ज्याला डेट केले त्याच्याशी मी पहिले लग्न केले. तिला समजत नव्हते की मी हे असे का केले.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, ” आई म्हणायची जर तू असं केलंस तर जगात काय आहे, हे तुला कसं कळेल?” आणि मी म्हणायचे, “आई, आता शांत हो…” पण ती नेहमीच आम्हाला जगायला आणि स्वप्न पाहायला प्रोत्साहित करायची. तिनं आम्हाला कधीही काहीही करण्यापासून रोखलं नाही.”
Dhurandhar रिलीजच्या तोंडावर असताना Ranveer Singh अडचणीत, Kantara वादावरून FIR दाखल
बॉलीवूडची मुन्नी म्हणजेच मलायका अरोरा, आजही अनेकांची लोकप्रिय अभिनेत्री आहे. वयाची पन्नाशी पार केलेली मलायका अरोरा आजही भल्याभल्या तरुणींना टक्कर देते. मलायकानं 1998 मध्ये अरबाज खानशी लग्न केले. परंतु, २०१८ मध्ये दोघांच्या नात्यात मिठाचा खडा पडला आणि दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मलायका अरोरा नेहमीच तिच्या फॅशन आणि वक्तव्यामुळे चर्चेत असते.






