Dhurandhar रिलीजच्या तोंडावर असताना Ranveer Singh अडचणीत (Photo Credit - X)
बंगळूरूमध्ये एफआयआर दाखल
रणवीर सिंगचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि लोकांचा तीव्र रोष पाहिल्यानंतर त्याने सोशल मीडियावर माफीही मागितली होती. मात्र, त्याच्या माफीनाम्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता हा वाद इतका वाढला आहे की, अखेर या प्रकरणात रणवीर सिंगविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. बंगळूरू येथील एका पोलीस स्टेशनमध्ये अभिनेत्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Ranveer Singh in legal trouble, complaint filed for insulting Daiva tradition A Bengaluru-based advocate has filed a complaint against Ranveer Singh for mimicking the Daiva scene from Kantara Chapter 1 at IFFI, alleging the act hurt religious sentiments of the Tulu-speaking… pic.twitter.com/XPiELxBiAm — IndiaToday (@IndiaToday) December 3, 2025
काय म्हणाला होता रणवीर?
२८ नोव्हेंबर रोजी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग IFFI मध्ये ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसला. याच दरम्यान त्याने ऋषभच्या ‘दैव्य’ सीनची नक्कल सुरू केली आणि ‘दैव्य’ला ‘फीमेल घोस्ट’ असे संबोधले. यावेळी, बाजूलाच उपस्थित असलेले ऋषभ शेट्टी इशारे करून रणवीरला असे करण्यापासून रोखतानाही दिसले. ‘कांतारा’ चित्रपटाबद्दल बोलताना रणवीर म्हणाला होता, “मी हा चित्रपट पाहिला आहे आणि तुमचा परफॉर्मन्स शानदार होता ऋषभ. खासकरून जेव्हा ‘फीमेल घोस्ट’ तुमच्यात समाविष्ट होते.”
#RanveerSingh literally called Chavundi Mata a GHOST 😡😡😡 Mimicked her in funny way 🙂↔️🙂↔️🙂↔️🙂↔️ Man is working hard to make things difficult for #Dhurandhar ‼️pic.twitter.com/HeNyi60lu7 — Pan India Review (@PanIndiaReview) November 29, 2025
माफीही निरुपयोगी
या व्हिडिओवर लोकांचा संताप पाहिल्यानंतर रणवीर सिंगने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत माफी मागितली होती. कोणत्याही व्यक्तीला किंवा भावनांना ठेस पोहोचवण्याचा आपला हेतू नव्हता, केवळ ऋषभ शेट्टीच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुक करणे हाच आपला उद्देश होता, असे त्याने स्पष्ट केले होते. परंतु, रणवीरचा हा माफीनामा जनतेने स्वीकारला नसल्याचे दिसत आहे आणि म्हणूनच आता प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. ‘धुरंधर’ चित्रपट प्रदर्शनाच्या तोंडावर रणवीर सिंग एका नव्या कायदेशीर अडचणीत सापडला आहे.






