Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझ्या लग्नात मला बोलावलंच नाही…’, भाऊ कदमच्या व्हायरल पोस्टवर लेकीची प्रतिक्रिया; मीडियावर साधला निशाणा

मराठी कॉमेडी अभिनेते भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी कदम हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जी सध्या चर्चेत आहे. तसेच इंटरनेटवर तिचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 20, 2026 | 01:34 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भाऊ कदमच्या व्हायरल पोस्टवर लेकीची प्रतिक्रिया
  • मृण्मयी कदमने मीडियावर साधला निशाणा
  • मृण्मयी कदम नक्की काय म्हणाली?
 

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कॉमेडी अभिनेते भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी कदम सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये तिने आपल्या लग्नाबाबत पसरत असलेल्या अफवांवर थेट भाष्य केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर भाऊ कदम यांचा एक फोटो व्हायरल होत होता. त्या फोटोसोबत “मृण्मयीच्या लग्नात भाऊ कदम झाले भावुक, संघर्षाचे दिवस आठवून उपस्थितींच्या डोळ्यात आले पाणी” असे कॅप्शन देण्यात आले होते. या पोस्टमुळे मृण्मयीचे लग्न झाल्याची चर्चा जोर धरू लागली. मात्र, या सर्व अफवांना मृण्मयीने स्वतः पुढे येत पूर्णविराम दिला आहे.

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचं औचित्य साधत ‘स्वामी गुरुमाऊली’ गाणं प्रदर्शित; अभिनेता सनी कांबळेचं दिग्दर्शनात पदार्पण

मृण्मयीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या बातमीवर नाराजी व्यक्त करत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “माझ्या लग्नात मला बोलावलंच नाही आहे, हे काही बरोबर नाही आहे. मी सध्या अमेरिकेत आहे आणि मलाच माहिती नाही की माझं लग्न झालं आहे.” तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर हशा पिकला असला, तरी तिने मीडियाच्या गैरजबाबदार वृत्तांकनावर बोट ठेवले आहे.

 

पुढे ती म्हणाली, “एंगेजमेंटपर्यंत तरी लिहायचं, डायरेक्ट मॅरीड का करायचं?” असा सवाल करत तिने या बातम्यांमागील निष्काळजीपणावर टीका केली. मृण्मयीने मीडियाला फटकारत सांगितले की, “काम करताय तर व्यवस्थित करा, स्वतःचं काम तरी नीट करा.” असे तिने म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे सोशल मीडियावर फेक न्यूज कशी पसरते आणि त्याचा संबंधित व्यक्तींवर काय परिणाम होतो, याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणतीही माहिती शेअर करताना ती खात्रीशीर असणे किती महत्त्वाचे आहे, हेही या घटनेतून स्पष्ट झाले.

Bewaras: दिवंगत विक्रम गोखलेयांचा अखेरचा चित्रपट ‘बेवारस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस!

दरम्यान, मृण्मयी कदमचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, अनेकजण तिच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक करत आहेत. काहींनी मीडियाच्या या चुकीच्या वृत्तांकनावर टीका केली आहे, तर काहींनी या प्रकाराकडे विनोदी दृष्टीनेही पाहिले आहे. एकूणच, या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, सोशल मीडियाच्या युगात कोणतीही बातमी व्हायरल होण्यास वेळ लागत नाही, पण तिची सत्यता तपासणे तेवढेच आवश्यक आहे.

Web Title: Bhau kadam daughter mrunmayee reacts to viral marriage news slams media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट
1

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित
2

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Tata Sierra Legend Series लाँच; ₹11.99 लाखांपासून किंमत, प्रीमियम फीचर्सचा भर
3

Tata Sierra Legend Series लाँच; ₹11.99 लाखांपासून किंमत, प्रीमियम फीचर्सचा भर

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
4

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.