
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता वातावरण तापणार आहे. हा नवाकोरा सीझन सुरु होण्यासाठी आता अवघे ७२ तास उरले आहेत आणि सोशल मीडियावर स्पर्धकांच्या नावाची सुरु देखील झाली आहे. रितेश भाऊंच्या या खेळात कोण कोण राडा घालायला सज्ज आहे. हे आता काही दिवसातच समजणार आहे. याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच कलर्स मराठीने ‘बिग बॉस’चे काही प्रोमो शेअर केले आहेत. ज्यामध्ये स्पर्धकांची झलक चाहत्यांना दिसली आहे. ही पोस्ट पाहून इंटरनेटचा पारा चढवला आहे. आणि सगळे ‘बिग बॉस’ प्रेमी पोस्टला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
‘बिग बॉस मराठी ६’च्या स्पर्धकाबाबत सर्वात आधी एका नृत्यांगनेचा प्रोमो समोर आला. ही नृत्यांगना राधा मुंबईकर असल्याचे म्हटले जात आहे. परंतु काही प्रेक्षकांनी कमेंट करत ती गौतमी पाटील असल्याचाही अंदाज बांधला आहे. यानंतर आणखी दोन प्रोमो समोर आले आहेत. ज्यात एका बोल्ड अभिनेत्रीची झलक पाहायला मिळाली, तरदुसऱ्या प्रोमोमध्ये लोकप्रिय रीलस्टारची झलक पाहायला मिळाली आहे.
एपी ढिल्लनचा कॉन्सर्ट तारा सुतारियाला पडला भारी? बॉयफ्रेंड वीर पहारियाने अभिनेत्रीशी केला Breakup?
कोण आहे ही ‘बोल्ड अभिनेत्री’?
कलर्स मराठीच्या अधिकृत पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओवर असे कॅप्शन देण्यात आले की, ‘सौंदर्य आणि बोल्डनेस घेऊन घरातलं वातवरण हॉट-हॉट करायला येतेय ही नखरेल गर्ल…’ ग्रँड प्रीमियर सोहळ्यात ही हसीना बोल्डनेसचा तडका देणार आहे, तिच्या सादरीकरणाची झलक या प्रोमोत पाहायला मिळाली. तिच्या परफॉर्मन्सदरम्यान कंबरेवरील एक टॅटू पाहून एका नेटकऱ्याने ही सोनाली राऊत असल्याचे ओळखले आहे. अभिनेत्री याआधी ‘बिग बॉस ८’ हिंदी मधेही दिसली आहे.
मराठमोळ्या रीलस्टारची एन्ट्री
तर दुसऱ्या प्रोमोमध्ये ‘बाला… बाला…’ या गाण्यावर डान्स करत एका तरुणाची एन्ट्री दाखवली आहे. ग्रँड प्रीमियरमधील सादरीकरणामध्ये त्याने रींग लाइट या प्रॉपचा वापर केल्याने, तो इन्फ्लूएन्सरच असावा असा अंदाज आहे. शिवाय नेटकऱ्यांनी तो करण सोनवणे म्हणजेच Focused Indian असल्याच्या असंख्य कमेंट केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असणारे त्याचे एक पात्र म्हणजेच ‘सोनवणे वहिनी’, तर ‘या सोनवणे वहिनी आहेत’ अशीही कमेंट देखील चाहत्यांनी केली आहे.
खुशी कपूर आणि वेदांग रैनाचे झाले ब्रेकअप! दोन वर्षांच्या डेटिंगनंतर कपलचे मार्ग झाले वेगळे
तसेच आता या दोघांची नवे समोर आल्यानंतर या घरात आणखी कोण कोणते स्पर्धक एन्ट्री करणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत, ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ येत्या ११ जानेवारी पासून रात्री ८ वाजता कॉलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसेच हा शो जिओ हॉटस्टारवर देखील प्रसारित केला जाणार आहे.