(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक असलेल्या तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांनी त्यांचे नाते संपुष्टात आणले होते. ही बातमी चाहत्यांसाठी आश्चर्यचकित करणारी होती, विशेषतः त्यांनी अलीकडेच त्यांचे नाते सार्वजनिक केले होते. फिल्मफेअरमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तांनुसार, तारा आणि वीर यांनी २०२५ च्या सुरुवातीला डेटिंग सुरू केली आणि खाजगी कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसल्याने त्यांच्या नात्याबद्दलच्या अटकळांना वेग आला. त्यांची केमिस्ट्री लवकरच स्पष्ट झाली. २०२५ च्या मध्यापर्यंत दोघांनी त्यांचे नाते अधिकृत केले. आणि आता या दोघांनी काही महिने एकत्र राहिल्यानंतर आता त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समजले आहे.
एपी ढिल्लनच्या कॉन्सर्टमध्ये उडाला गोंधळ
काही आठवड्यांपूर्वीच, हे जोडपे सोशल मीडियावर चर्चेत आले. तारा आणि वीर पहारिया एपी ढिल्लनच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये दिसले, ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला. गायक एपी ढिल्लनने अभिनेत्री ताराच्या गालावर चुंबन घेतले. त्यावेळी तिचा प्रियकर वीर उपस्थित होता आणि त्याची प्रतिक्रिया व्हायरल झाली. यामुळे तो खूप नाराज झाला होता असे मानले जात आहे.
आता दुबईत रंगणार मराठी सिनेसृष्टीची क्रिकेट मॅच! सुशांत शेलार घेऊन येत आहेत SSCBCL
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, ताराने स्पष्ट केले की, “खोट्या अफवा, हुशार एडिटिंग आणि पैसे देऊन केलेले पीआर एजंट मला दुखवू शकत नाहीत. शेवटी प्रेम आणि सत्याचा विजय होतो.” वीरनेही व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले की त्याची व्हायरल प्रतिक्रिया एपी ढिल्लन यांच्या “थोडी सी दारू” या गाण्याबद्दल नव्हती, तर एका वेगळ्या गाण्याबद्दल होती.
वीर आणि ताराचे ब्रेकअप झाले ब्रेकअप?
परंतु, आता सूत्रांचे म्हणणे आहे की या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेकअपचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तारा किंवा वीर दोघांनीही त्यांच्या कथित ब्रेकअपवर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. उल्लेखनीय म्हणजे, दोन्ही कलाकारांनी मागील मुलाखतींमध्ये त्यांच्या खोल नात्याबद्दल उघडपणे सांगितले आहे. वीरने एकदा त्यांच्या पहिल्या डेटबद्दल सांगितले होते, जिथे तो पियानो वाजवत होता आणि ताराने सूर्योदयापर्यंत गाणे गायले होते. सध्या, दोघांनीही ब्रेकअपची पुष्टी केलेली नाही.
खुशी कपूर आणि वेदांग रैनाचे झाले ब्रेकअप! दोन वर्षांच्या डेटिंगनंतर कपलचे मार्ग झाले वेगळे
कामाच्या बाबतीत सांगायचे झाले तर, तारा सुतारिया आता आगामी प्रदर्शित होणाऱ्या यश, कियारा अडवाणी आणि हुमा कुरेशी यांच्यासोबत टॉक्सिक चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटातील तिचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे आणि त्याचे भरभरून कौतुक केले जात आहे. तसेच वीर देखील अभिनेता आहे त्याने अक्षय कुमारसोबत ‘स्काय फोर्स’ या चित्रपटामधून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.






