Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत खडा पहारा ! अंजनी धरणातून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

Jalgaon News: खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने आणि अलनिनोच्या प्रभावामुळे एरंडोल तालुक्यात संभाव्य पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे अंजनी धरणातील पिण्याच्या पाण्याचा आरक्षित साठा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 05, 2026 | 06:55 PM
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अंजनी धरणावर २४ तास पहारा
  • अवैध पाणी उपशावर प्रशासनाची कारवाई
  • धरणात सध्या ८३.४० टक्के जलसाठा

एरंडोल (वा.) चालू खरीप हंगामात पावसाने दिलेली ओढ आणि ‘अलनिनो’च्या प्रभावामुळे तालुक्यावर संभाव्य भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत, आगामी काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी एरंडोल तालुक्यातील अंजनी धरणातील आरक्षित जलसाठ्याच्या रक्षणासाठी प्रशासनाने आक्रमक पावले उचलली आहेत. Jalgaon News:

पाण्याचा अनधिकृत व अवैध उपसा पूर्णपणे रोखण्यासाठी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबण्यात आले असून, धरणावर २४ तास खडा पहारा देण्यास सुरुवात झाली आहे. ८ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पाण्याची नासाडी आणि चोरी रोखण्यासाठी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार गोपाळ पाटील आणि गिरणा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी कुलदीप पाटील यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली धडक कारवाई केली जात आहे.

Jalgaon News: १०८ पाठोपाठ १०२ ही डळमळीत ! २४ तासांसाठी एकच कंत्राटी चालक; प्रसूतीसाठीही रुग्णांची गैरसोय

अंजनी धरणात जलसाठा….

अलनिनोचा प्रभाव आणि दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचे अत्यंत काटकसरीने नियोजन केले जात आहे. सध्या अंजनी धरणात ८३.४० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तर एकूण पाणीसाठा १६.७९९ दलघमी असून उपयुक्त पाणीसाठा १३.०२७ दलघमी इतका आहे. अंजनी धरणाव्यतिरिक्त भालगांव तलाव व दहिगाव बंधारा या दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणीही अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रत्येक थेंब सुरक्षित राखण्यासाठी तालुका प्रशासन आणि पाटबंधारे विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले आहे.

पाणी वाचविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी मैदानात

अंजनी धरणातील पाण्याचा थेंबन्थेंब वाचवण्यासाठी विविध शासकीय यंत्रणा एकत्र आल्या असून खालील विभागांचे अधिकारी-कर्मचारी संयुक्तपणे मैदानात उतरले आहेत. पथकांमध्ये महसूल विभाग, स्थानिक प्रशासन, महावितरण तांत्रिक कर्मचारी, पाटबंधारे विभाग लघु पाटबंधारे विभाग व पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारांचा समावेश आहे.

Jalgaon Gold Rate | जळगावात सोन्याच्या दरात ५०० रुपयांची घसरण; दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

कारवाईचे स्वरुप

  • अंजनी धरणातून होणारी पाणी चोरी रोखण्यासाठी प्रत्येकी ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांची दोन विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली असून, ती दोन शिफ्टमध्ये दिवसरात्र पहारा देत आहेत.
 
  • नदीपात्रातून किवा मुख्य जलवाहिन्यांवरून अनधिकृतपणे पाईपलाईन टाकून अथवा मोटारीच्या सहाय्याने पाणी उपसणाऱ्यांचे साहित्य व पंप जप्त केले जात आहेत.
 
  • सुरक्षेचा उपाय म्हणून धरणावरील मुख्य विद्युत्त प्रवाह देखील बंद करण्यात आला आहे.
 
  • नियमबाह्य पद्धतीने पाणी उपसा करताना आढळणाऱ्या शेतकरी किंवा व्यावसायिकांवर कारवाई करत महावितरणमार्फत त्यांचे कृषी वीज कनेक्शन तात्काळ खंडित केले जात आहे.
 
  • वारंवार सूचना देऊनही पाणी चोरी न चांबवणाऱ्यांवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
💡

Frequently Asked Questions

  • Que: अंजनी धरणात सध्या किती जलसाठा आहे?

    Ans: अंजनी धरणात सध्या ८३.४० टक्के जलसाठा आहे.

  • Que: धरणावर २४ तास पहारा का ठेवण्यात येत आहे?

    Ans: पिण्याच्या पाण्याचा आरक्षित साठा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पहारा दिला जात आहे.

  • Que: पाणी चोरी करणाऱ्यांवर कोणती कारवाई होणार?

    Ans: पंप व साहित्य जप्त करणे, कृषी वीज कनेक्शन खंडित करणे आणि फौजदारी गुन्हे दाखल करणे अशी कारवाई होणार आहे.

Web Title: Erandol anjani dam water conservation illegal water extraction action rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • Jalgaon
  • Jalgaon News
  • Jalgaon Politics
  • Marathi News

संबंधित बातम्या

Gold Price Prediction 2026: सोने खरेदीची हीच योग्य वेळ? घसरणीनंतर पुन्हा मोठी उसळी घेण्याचा अंदाज
1

Gold Price Prediction 2026: सोने खरेदीची हीच योग्य वेळ? घसरणीनंतर पुन्हा मोठी उसळी घेण्याचा अंदाज

Kon Honar Crorepati: आई आज असती तर माझ्या खांद्यावर ३ स्टार असते…” KBC च्या मंचावर डिलिव्हरी बॉयची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी!
2

Kon Honar Crorepati: आई आज असती तर माझ्या खांद्यावर ३ स्टार असते…” KBC च्या मंचावर डिलिव्हरी बॉयची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी!

Jio vs Airtel: खिशाला परवडणारा डेटा प्लॅन कोणाचा? Jio-Airtel च्या स्वस्त रिचार्जमध्ये चुरस!
3

Jio vs Airtel: खिशाला परवडणारा डेटा प्लॅन कोणाचा? Jio-Airtel च्या स्वस्त रिचार्जमध्ये चुरस!

Jio 15 Rupees Plan: मोठ्या फाइल्स डाउनलोड करा बिनधास्त! Jio चा 15 रुपयांचा डेटा पॅक
4

Jio 15 Rupees Plan: मोठ्या फाइल्स डाउनलोड करा बिनधास्त! Jio चा 15 रुपयांचा डेटा पॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.