(फोटो सौजन्य-Social Media)
बिग बॉस मराठीचे यावर्षीचा ५ सिझन सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. चाहत्यांनी हा शोला भरभरून पूर्वमी दिले आहे. २८ जुलै रोजी या शोचा ग्रँड प्रीमियर पार पडला आणि त्या दिवसापासून ५० हून अधिक दिवस यामधील स्पर्धक बिग बॉसच्या घरात आनंदाने राहत आहेत. तसेच संग्रामची वाइल्ड कार्ड एंट्रीही झाली असून, या खेळात अजून १० स्पर्धक टिकून राहणार आहेत. १०० दिवसाच्या या खेळासाठी बिग बॉसचा प्रत्येक चाहता उत्सुक असतो. हा खेळ पाहण्यासाठी बिग बॉसप्रेमी आतुर असतात. परंतु, हिंदी-मराठी बिग बॉसचा इतिहास पाहता, एखादा सीझन खूपच गाजला तर या नियोजित दिवसांपेक्षा आणखी काही दिवस खेळ वाढवला जातो. मात्र मराठी बिग बॉसच्या या पर्वाबाबत एक वेगळे अपडेट आता समोर आले आहे. जे ऐकून बिग बॉसप्रेमींना धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर बिग बॉस मराठीच्या या पर्वाचे विविध फॅनपेज तयार करण्यात आली आहेत. या फॅनपेजला चाहते प्रचंड प्रेम देत आहेत. त्यापैकी काही ठिकाणी अशी चर्चा आहे की येत्या ६ ऑक्टोबर रोजी या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. असे सांगितले जात आहे की, सूरज चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, अंकिता प्रभू वालावलकर, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, वर्षा उसगांवकर, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, संग्राम चौघुले या स्पर्धकांमध्ये हा फिनाले पार पडणार आहे. १० स्पर्धकांपैकी विजेता कोण ठरेल, हे ६ ऑक्टोबर रोजी जाहीर केले जाणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या अपडेटमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, कारण तसे झाल्यास १०० दिवसांचा खेळ अवघ्या ७० दिवसात संपणार आहे. याचीच चिंता बिग बॉसप्रेमींना वाटते आहे.
हे देखील वाचा- ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ चित्रपटाबाबत राधिका मदानने केला मोठा खुलासा, म्हणाली- “वाईट ऑडिशनमुळे…”
सोशल मीडियावर व्हायरल असलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ६ ऑक्टोबरच्या रविवारी BB मराठी ५ चा ग्रँड फिनाले पार पडेल. यामध्ये कोण विजेता ठरेल, असाही प्रश्न विचारण्यात आला आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या मते कोण विजेता ठरेल, याविषयी मत मांडले आहे. दरम्यान सोशल मीडियावर ही अशी चर्चा असली तरीही, कलर्स मराठी वाहिनीकडून अद्याप अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन सर्वाधिक टीव्हीआर रेटिंग असणारा सीझन आहे, त्यामुळे या पर्वाची लोकप्रियताही उंचावर पोहचली आहे. असे असताना मेकर्सकडून ७० दिवसात शो आटोपण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता कमीच आहे.