(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
राधिका मदान ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे. ‘पटाखा’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या राधिकाने ‘अंग्रजी मीडियम’ आणि ‘सरफिरा’ सारख्या चित्रपटांमधील आपल्या अभिनयासाठी मोठी प्रशंसा मिळवली आहे. अलीकडेच, तिने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात धर्मा प्रोडक्शनच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ साठी दिलेल्या एका आव्हानात्मक ऑडिशनबद्दल उघडपणे सांगितले आहे.
राधिकाने या चित्रपटाच्या ऑडिशनची खूप तयारी केली होती, इतकी की ती झोपेतही ऑडिशनची स्क्रिप्ट वाचायची. पण ऑडिशनच्या एक दिवस आधीच ती आजारी पडली. तिच्यासाठी हे ऑडिशन म्हणजे करिअरसाठी खूप मोठी संधी होती. आणि तिने याबद्दल खूप विचार केला आणि त्यातून ती मानसिकरित्या घाबरली आणि जास्त आजारी पडली. एका मुलाखतीत तिने सांगितले, “मला ताप आणि सर्दी झाली होती, आणि मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट ऑडिशन यावेळी दिला.” असे तिने सांगितले. आणि जेव्हा ती ऑडिशनमधून घरी परतली, तेव्हा ती खूपच चिंताग्रस्त होती आणि ती रात्री झोपू शकली नाही. त्या रात्री तिने स्वतःला वचन दिले की ती पुन्हा कधीही असे अनुभव अनुभवणार नाही.
मात्र, हे अपयश राधिकासाठी एक महत्त्वाचा पुढे जाण्याचा मार्ग ठरला. तिला जाणवले की जास्त विचार करणे हे तिच्या कामगिरीमध्ये अडथळा आणत होते, आणि तिने स्वतःला वचन दिले की ती आता अधिक शांत आणि सहज दृष्टिकोन स्वीकारेल. “त्या दिवशी, मी स्वतःला सांगितलं की मी पुन्हा असं कधीच अनुभवणार नाही,” “मी अशी जीवनशैली नाही जगणार जिथे फक्त संभ्रम आणि चिंता असते.” असे अभिनेत्री म्हणाली.
हे देखील वाचा- प्रसिद्ध गायिका रुक्साना बानोने घेतला जगाचा निरोप, कुटुंबियांकडून विषप्रयोग केल्याचा आरोप!
ऑडिशनच्या दोन आठवड्यांनंतर, राधिकाला ‘पटाखा’ साठी ऑडिशनसाठी फोन आला. अभिनेत्री याबद्दल म्हणाली, “मला सांगितलं की ही विशाल भारद्वाज यांची फिल्म आहे, आणि मी उत्तर दिले की ते मला नाही घेणार. मी फक्त दोन मिनिटांसाठी का होईना,मी ते पात्र साकारेल.” असे तिने सांगितले. सुरुवातीच्या शंका असूनही, तिने या चित्रपटाचे ऑडिशन दिले. तेव्हापासून प्रत्येक ऑडिशनमध्ये तिने हीच मानसिकता ठेवली आहे की ती फक्त त्या पात्राचे आयुष्य जगण्यासाठी तिथे आहे, मग ते फक्त दोन मिनिटांसाठी का असेना. ‘पटाखा’ तिच्या करिअरचा पहिला चित्रपट ठरला आणि तिला यशाच्या उंचीवर नेऊन पोहोचवले. या चित्रपटानंतर अभिनेत्री अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केले. आणि चाहत्यांच्या मनात घर केले.