Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आशा’चे प्रेरणादायी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, संघर्ष आणि जिद्दीची गर्जना करणारे गीत प्रदर्शित

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू आता नुकताच तिचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. अभिनेत्रीचा 'आशा' या आगामी चित्रपटामधील पहिल्या गाण्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 28, 2025 | 02:34 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘आशा’चे प्रेरणादायी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
  • संघर्ष आणि जिद्दीची गर्जना करणारे गीत प्रदर्शित
  • ‘आशा’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
 

”बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये” अशा प्रभावी टॅगलाईनसह मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूचा नवा चित्रपट ‘आशा’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता, ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने आपली ताकद सिद्ध करून दाखवली आहे. आणि ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळवत ‘आशा’ने समीक्षकांची दाद मिळवली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

महाराष्ट्राचे हास्यसम्राट काळाच्या पडद्याआड! ‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

‘चालत रहा पुढं… चालत रहा पुढं… ‘ अशी अस्मितेने भरलेली हाक देत ‘आशा’ चित्रपटाचे प्रेरणादायी गाणं देखील नुकतेच प्रदर्शित झाले आहे. प्रेक्षकांच्या मनाला भिडताना दिसत आहे. गीतकार वलय मुळगुंद यांनी लिहिलेल्या शब्दांना संगीतकार आशिष झा यांनी प्रभावी संगीत दिले असून गायिका प्राची केळकर यांच्या दमदार आवाजाने हे गाणे अधिकच सशक्त झाले आहे. या गाण्यात संघर्षाची ठिणगी, आशेची ज्योत आणि प्रत्येक पावलागणिक उलगडणाऱ्या प्रकाशाची नवी चाहूल जाणवते. मनाला उभारी देणारे हे ॲंथम साँग केवळ ‘आशा’ सेविकेचे नसून त्या प्रत्येक स्त्रीचे आहे, जिचा अंतरंगात दडलेल्या उजेडावर विश्वास आहे.

 

या गाण्याबद्दल दिग्दर्शक दिपक पाटील म्हणतात, ” ‘आशा’मधील हे गाणं म्हणजे प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे. ही केवळ आशा सेविकांची गोष्ट नाही, तर कुटुंबासाठी झगडणाऱ्या, स्वप्नांसाठी लढणाऱ्या आणि कोणत्याही संकटात न डगमगणाऱ्या प्रत्येक बाईची प्रेरक धडाडी आहे. या गाण्यातून आम्ही तिच्या ताकदीला आणि तिच्या अविरत प्रवासाला सलाम केला आहे.”

डबल मर्डर आणि संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली गृहिणी, OTT वर गाजणार राधिका आपटेची ‘साली मोहब्बत’

‘आशा’मध्ये महिलांची झगडणारी दुनिया आणि समाजाप्रती असलेली त्यांची अमर्याद जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रिंकू राजगुरू, सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दिपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’चे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील निर्माते आहेत. तर मुरलीधर छतवानी आणि रवींद्र औटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित होणारा हा चित्रपट येत्या १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Chalat raha pudhe the first song from rinku rajguru upcoming film aasha released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • rinku rajguru

संबंधित बातम्या

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत
1

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
2

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’
3

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका!  ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन
4

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका! ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.