Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satish Shah Passes Away : Bollywood मध्येच नाही तर Marathi Movie मध्येही सतीश शहा यांचा अभिनयाचा डंका

हिंदीप्रमाणे त्यांनी मराठी सिनेमात देखील आपली छाप पाडली होती. मराठी दोन गाजलेले सिनेमे म्हणजे गंमत जंमत आणि वाजवा रे वाजवा. या दोन्ही सिनेमात सतीश शाह झळकले होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 02, 2025 | 07:08 PM
Satish Shah Passes Away : Bollywood मध्येच नाही तर Marathi Movie मध्येही सतीश शहा यांचा अभिनयाचा डंका
Follow Us
Close
Follow Us:

 

  • रसिक प्रेक्षकांना लोटपोट हसवणारा अभिनेता काळाच्या पडद्याआड
  • सतीश शहा यांचे मराठीतील सिनेमे
  • विनोदी अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मनं
रसिक प्रेक्षकांना लोटपोट हसवणारा एक हरहुन्नरी अभिनेता आज काळाच्या पडद्याआड गेला. ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांनी मालिका, नाटक आणि सिनेमा या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली. सतीश शहांनी हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चा ठसा उमटवला खरा पण त्यांची मराठीशी नाळ देखील तितकीच जोडलेली होती. असं म्हटलं जातं की, खरा कलाकार तोच ज्याला अभिनयाच्या कौशल्याबरोबरच अचूक टायमिंग साधता येतं.तुम्ही साकारत असलेली व्यक्तिरेखेचा काळ किती आहे यापेक्षा तुम्ही ती व्यक्ती व्यक्तीरेखा कशी साकारता आणि त्या त्या ठराविक वेळेतील ती तुमची भुमिका प्रेक्षकांच्या किती लक्षात राहते याला देखील महत्व आहे. असे फार कमी कलाकार असतात ज्यांना असं कौशल्य अवगत असतं. त्या कलाकारांमधील एक म्हणजे सतीश शहा.

Satish Shah Death: १९७० च्या दशकात पदार्पण, २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम,अभिनयाची खासियत आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत

हिंदीप्रमाणे त्यांनी मराठी सिनेमात देखील आपली छाप पाडली होती. त्यांचे  मराठीतील दोन गाजलेले सिनेमे म्हणजे ‘गंमत जंमत’ आणि ‘वाजवा रे वाजवा’. या दोन्ही सिनेमात सतीश शाह झळकले होते. त्यांची भूमिका अत्य़ंत छोटी होती मात्र याचा प्रभाव आजही प्रेक्षकांच्य़ा मनावर आहे. विनोदाचा टायमिंग उत्तम असणाऱ्या या अभिनेत्याने ‘वाजवा रे वाजवा’ या सिनेमात चक्क खलनायकाची भूमिका साकारली होती. आपल्या प्रतिष्ठेसाठी आणि नसत्या अहंकारापोटी बाबुराल जैन आपल्य़ा पोटच्या मुलींच्या सुखाला पायदळी तुडवायला देखील मागेपुढे पाहत नाही. एक प्रतिष्ठीत उद्योजक पण माणूस म्हणून अत्यंत वाईट, स्वत:च्य़ा स्वार्थासाठी मैत्रीत विश्वासघात करणारा अशी बाबुराल जैनची भूमिका सतीश शहांनी साकारली होती. या सिनेमात अशोक सराफ, प्रशांत दामले, किशोरी शहाणे, अजिंक्य देव, निशिगंधा वाड अशी मातब्बर कलाकरांची टीम होती. 1993 मध्ये आलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांना तितकाच आवडतो.

याचबरोबर मराठीतील आणखी असाच एक गाजलेला सिनेमा ज्याच्या शिवाय विनोदी सिनेमाची लीस्ट पूर्ण होऊच शकत नाही तो म्हणजे ‘गंमत जंमत’. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावर यांच्या या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पदड्यावर मुख्य नायिका म्हणून वर्षा उसगावकर यांचं पदार्पण मनोरंजन सृष्टीत झालं. गंमत जंमत सिनेमात देखील सतीश शहा यांनी विनोदी पोलिसाची भूमिका साकारली होती. या सिनेमात इन्स्पेक्टर फुटाणे असं त्यांच्या भूमिकेचं नाव होतं. या सिनेमातही त्यांची भूमिका छोटीच होती पण त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पाडलं, असा हा विनोदवीर ज्याची फक्त हिंदीशीच नाही तर मराठी सिनेसृष्टीशी देखील तितकीच नाळ जोडली होती.

Satish Shah Passes Away: चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर! प्रेक्षकांना हसवणारे दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे निधन

 

 

 

Web Title: Comedy actor satish shah act in marathi movie gammat jammat and wajva re wajva

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 05:24 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Satish Shah

संबंधित बातम्या

‘मी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडेन… पण, मी स्वतःला बदलणार नाही’, असं ‘का’ म्हणाला होता ‘धुरंधर’ अभिनेता अक्षय खन्ना?
1

‘मी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडेन… पण, मी स्वतःला बदलणार नाही’, असं ‘का’ म्हणाला होता ‘धुरंधर’ अभिनेता अक्षय खन्ना?

होणार मोठा धमाका! Border 2 चा टीझर लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस; निर्मात्यांनी नवे पोस्टरही केले शेअर
2

होणार मोठा धमाका! Border 2 चा टीझर लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस; निर्मात्यांनी नवे पोस्टरही केले शेअर

गर्ल गँगचा कमबॅक! ‘Four More Shots Please’ च्या चौथ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित; प्रेक्षकांचे होणार डबल Entertainment
3

गर्ल गँगचा कमबॅक! ‘Four More Shots Please’ च्या चौथ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित; प्रेक्षकांचे होणार डबल Entertainment

‘ह्युमन कोकेन’चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित; अंधारमय, धोकादायक आणि भयानक वास्तवाने प्रेक्षक स्तब्ध
4

‘ह्युमन कोकेन’चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित; अंधारमय, धोकादायक आणि भयानक वास्तवाने प्रेक्षक स्तब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.