
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस’ मराठीचं यंदाचं घर हे सोपं नसणार आहे. यावेळी ‘स्वर्ग आणि नर्क’ अशी थक्क करणारी थीम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला स्पर्धकांचा आनंद आणि दुसरीकडे त्यांचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. या नव्या संकल्पनेमुळे घरातील सदस्यांचे खरे चेहरे तर समोर येणारच आहे, पण मैत्री आणि गद्दारीची नवी समीकरणंही पाहायला मिळणार आहेत. हा शो प्रेक्षकांना आता टीव्हीवरच नाही तर जिओ हॉटस्टारवरही पाहायला मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या पर्वासाठी काही दिग्गज नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजले आहे.
‘चला हवा येऊ द्या’ मध्ये विविध पात्रांनी हसवणारा महाराष्ट्राचा लाडका सागर कारंडे आता स्वतःच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मनं जिंकायला सज्ज झाला आहे. विनोदाचा बादशाह बिग बॉसच्या खेळात कसा टिकतो, हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच, आपल्या रोखठोक विधानांनी राजकारण आणि समाजकारण गाजवणाऱ्या दीपाली सय्यद देखील ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री करणार आहेत.
‘Stranger Things 5’ या डॉक्यूमेंट्रीचा भावुक करणारा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या रिलीज डेट
तसेच गाजलेल्या ‘शाळा’ वेब सीरिजमधून प्रसिद्ध झालेली अनुश्री यंदाच्या सीझनमध्ये राडा करताना दिसणार आहे. ‘छत्रीवाली’ फेम संकेत पाठकच्या रूपात घराला एक हॅण्डसम आणि लोकप्रिय अभिनेता मिळाला आहे. राधा मुंबईकर आणि रसिका जमसुतकर या दोन ग्लॅमरस अभिनेत्रींनीही घरात एन्ट्री करणार आहेत.
मागच्या पर्वात ‘झापूक झुपूक’ म्हणत अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या सुरज चव्हाणने बाजी मारली होती. साधेपणानेही शो जिंकता येतो, हे त्याने दाखवून दिले. आता सुरजसारखंच प्रेक्षकांचं प्रेम मिळवून यंदाची ट्रॉफी कोण उचलणार, हे पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक सज्ज झाले आहेत. सोशल मीडियावर सध्या इतर नावांवरूनही जोरदार चर्चा रंगली आहे, आता ‘बिग बॉस मराठी 6’ ११ जानेवारी पासून प्रेक्षकांसाठी सज्ज होणार आहे.