Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लक्ष्मी निवास’ मध्ये महाशिवरात्रीच्या पूजेत निलांबरीचा कट; सिद्धूचा थरारक सामना, जान्हवीची धक्कादायक एन्ट्री!

'लक्ष्मी निवास' मालिकेमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने विशेष भाग दाखवण्यात आला आहे. या भागात अनेक रहस्य उलगडणार असून, जान्हवीची धक्कादायक एन्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 18, 2026 | 02:09 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘लक्ष्मी निवास’ मध्ये महाशिवरात्रीच्या पूजेत निलांबरीचा कट
  • सिद्धूचा थरारक पाहायला मिळणार सामना
  • जान्हवीची होणार धक्कादायक एन्ट्री
 

गाडे पाटीलांच्या घरी महाशिवरात्रीचा सण दरवर्षी अत्यंत भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या पूजेची खास ओळख म्हणजे दरवर्षी नव्याने शंकराची पिंड तयार केली जाते. त्या पिंडीची विधीपूर्वक पूजा करून तिची घरात स्थापना केली जाते. यंदाही घरात उत्साह, श्रद्धा आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पवित्र दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र जमले असून सगळ्यांच्या चेहऱ्यावर भक्तिभाव आणि समाधान झळकत आहे.

Inspector Manju मध्ये नवा ट्विस्ट; सत्या–मंजूच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री!

यावर्षीच्या पूजेसाठी सिद्धू आणि भावना बसणार हे आधीच ठरलेले असते. ठरल्याप्रमाणे सिद्धू पिंड आणण्यासाठी बाहेर पडतो. मात्र, या दरम्यान निलांबरीने रचलेले कटकारस्थान मोठा अडथळा निर्माण करते. सिद्धूचा काही गुंडांसोबत सामना होतो आणि परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनते. या प्रसंगात एक थरारक फाइट रंगते. कुटुंबासाठी आणि परंपरेच्या मानासाठी सिद्धू धाडसाने लढतो. या संघर्षानंतर त्याचा दुग्धाभिषेक केला जातो, जो शुद्धीकरण आणि विजयाचे प्रतीक मानला जात आहे.

 

गोविंदा सेटवर, कार्यक्रमांमध्ये उशिरा का पोहोचतो? प्रसिद्ध संगीतकारानं सांगितला अभिनेत्याचा ‘तो’ किस्सा

अखेर सर्व अडथळ्यांवर मात करत सिद्धू विधीपूर्वक पिंड घेऊन घरी परततो. घरातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत भक्तिभावाने पूजेला सुरुवात होते. मंत्रोच्चार, आरती आणि शंखनादाने घराचे वातावरण पूर्णपणे भक्तिमय बनते. दरम्यान, या विशेष सोहळ्यात जान्हवीची एन्ट्री सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरते. ती सगळ्यांसमोर ठामपणे सांगते की काहीही झालं तरी ती जयंतकडे परत जाणार नाही. तिच्या या निर्णयामुळे घरातील वातावरण पुन्हा एकदा तणावपूर्ण होते. जान्हवी गाणं सादर करत असताना सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असतात. ती सगळ्यांसमोर येताच घरातील सदस्यांना मोठा धक्का बसतो. भक्ती, परंपरा, संघर्ष आणि भावनिक नाट्य यांचा संगम असलेला हा महाशिवरात्री विशेष प्रसंग प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे.

Web Title: Lakshmi niwas marathi serial mahashivratri special episode siddhu fight janhavi entry drama

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • entertainment
  • Indian Television
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती
1

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती

Chandrapur News: पावसाने पाठ फिरवली, उभी पिके वाळली;   गोंडपिपरीत दुष्काळाचे सावट, बळीराजाला आर्थिक मदतीची गरज
2

Chandrapur News: पावसाने पाठ फिरवली, उभी पिके वाळली; गोंडपिपरीत दुष्काळाचे सावट, बळीराजाला आर्थिक मदतीची गरज

Nagpur News :अन्यथा ओबीसींचे चलो दिल्ली ;२५ ऑक्टोबरला जिल्ह्यात मोर्चे
3

Nagpur News :अन्यथा ओबीसींचे चलो दिल्ली ;२५ ऑक्टोबरला जिल्ह्यात मोर्चे

Raigad News: उरणमध्ये पाणीटंचाईचे संकट? रानसई धरणाचा पाणीसाठा घटला; नोव्हेंबरपासून कपातीची शक्यता
4

Raigad News: उरणमध्ये पाणीटंचाईचे संकट? रानसई धरणाचा पाणीसाठा घटला; नोव्हेंबरपासून कपातीची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.