(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांचा दशावतार हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची कथा कोकणातील घनदाट जंगलात घडते. यात थरार, सस्पेन्स आणि भरपूर ड्रामा आहे. कोकणातील रूढीपरंपरा, लोककला आणि निसर्गाचे सुंदर दर्शन घडते. ‘दशावतार’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे.दशावतार या थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर उल्लेखनीय कामगिरी करत आहे.
सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपाने प्रदर्शित झाल्यावर दुसऱ्या शनिवारी म्हणजेच 9 व्या दिवशी तब्बल २.६५ कोटींची कमाई केली आहे. एका दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात जास्त कमाई आहे. दशावतार चित्रपटाने थिएटरमध्ये ११ दिवसांपूर्वी संपूर्ण देशभरात १६.६५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने दुसऱ्या रविवारी तब्बल 3 कोटी रुपयांची कमाई केली होती. सोमवार, 22 सप्टेंबर रोजी या सिनेमाच्या कमाईत थोडी घट झाली. दुसऱ्या सोमवारी सिनेमाने अंदाजे 80 लाखांची कमाई केली आहे.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दशावतर चित्रपटाच्या कमाईत थोडी घट दिसून आली आहे.
विवेक, रितेश आणि आफताब पुन्हा एकत्र, ‘मस्ती 4’मध्ये धमाल चार पटीने वाढणार!
दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर एक भावपूर्ण पोस्ट शेअर केली. त्यात लिहिले आहे, “दशावतार आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आमच्या दिलीप काकांना साष्टांग दंडवत! त्यांनी विश्वास ठेवला म्हणून हा चित्रपट साकार होऊ शकला.”
दशावतार या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात चित्रपटात दिलीप प्रभावळकर बाबुली मेस्त्रीची मुख्य भूमिका साकारत आहेत. त्यांची व्यक्तिरेखा कोकणातील एका समर्पित दशावतारी लोकनाट्यातील कलाकाराची आहे. तर सिद्धार्थ मेनन याने या सिनेमात बाबुली मेस्त्रीच्या मुलाची माधव मेस्त्रीची भूमिका साकारत आहे.
साऊथ स्टार पृथ्वीराज सुकुमारन आणि दुलकर सलमानच्या घरावर कस्टम्सचा छापा, काय आहे प्रकरण?
११ व्या दिवशी, ‘दशावतार’ ने मराठी थिएटरमध्ये एकूण १७.०४% प्रेक्षकसंख्या नोंदवली. सकाळच्या शोचे प्रमाण ९.२६ %, दुपारचे शो १७.१%, संध्याकाळच्या शोमध्ये आणखी थोडी वाढ म्हणजे १७.०७% आणि रात्रीच्या शोमध्ये २४.८१ % इतकी गर्दी नोंदवली गेली आहे.