Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Marathi Movie: मराठी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ कमाई! बॉलिवूड चित्रपटांना दिले चोख ‘उत्तर’! जाणून घ्या कमाई

बॉक्स ऑफिसवर जरी धुरंधर चित्रपटाची लाट आली असली तरी देखील एका मराठी चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. हा चित्रपट म्हणजे क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित 'उत्तर'

  • By मयुर नवले
Updated On: Jan 04, 2026 | 02:41 PM
मराठी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' कमाई!

मराठी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' कमाई!

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘उत्तर’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद
  • चित्रपटाने केली दमदार कमाई
  • जाणून घा आतापर्यंतचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांसमोर मराठी चित्रपट नेहमीच कमी पडतो. यामागे अनेक कारणं आहे. यातील मुख्य कारण म्हणजे कमी मिळणारे शोज. मात्र, काही चित्रपट असे असतात, जे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत बॉक्स ऑफिसवर भल्याभल्या बॉलिवूडच्या चित्रपटांना टक्कर देत असतात.

सध्या सगळीकडे धुरंधरची चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. यातच एक मराठी चित्रपट रिलीज झाला, जो धुरधंर सारखा चित्रपट समोर असताना सुद्धा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. हा चित्रपट म्हणजे ‘उत्तर’.

मराठी सिनेमाचा ऐतिहासिक क्षण, ऑस्करच्या दारात पोहोचला प्रभावळकरांचा ‘दशावतार’, मुख्य श्रेणी स्पर्धेत चित्रपटाची निवड

उत्तर हा मराठी चित्रपट आई-मुलाच्या सुंदर नात्यावर बनलेला चित्रपट आहे. या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे यांची मुख्य भूमिका आहे. गीतकार आणि लेखक क्षितिज पटवर्धन यांनी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात आपले पहिले पाऊल ठेवले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. तसेच वेळोवेळी, क्षितिज पटवर्धन या चित्रपटाच्या यशाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळाला, याबद्दल क्षितिजने इंस्टग्रामवर एक पोस्ट केली आहे.

वर्षाच्या पहिल्या सकाळी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

क्षितिज पटवर्धन यांनी दादरमधील एका थिएटरमधील फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की,“तुम्ही आमची पहिली सकाळच सुंदर केलीत! काल रात्री अचानक आज सकाळी 10 वाजताचा शो दादरमध्ये मिळाला. या शोची कुठेही पेपरमध्ये जाहिरात नव्हती, फक्त ऑनलाइन माहिती होती. वर्षाच्या पहिल्या सकाळी प्रेक्षक येतील का, अशी शंका मनात होती, पण प्रेक्षकांनी तो विचार करण्याचीही संधी दिली नाही. कारण ते आले—आणि केवळ आले नाहीत, तर मोठ्या संख्येने आले. चौथा आठवडा सुरू करताना आजच्या प्रेक्षकांनी आम्हाला चौपट उत्साह दिला. नव्या वर्षाची सुरुवात प्रेक्षकांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने झाली. सकाळच्या वेळेला एवढी गर्दी पाहून थिएटरमधील स्टाफही खूप आनंदी झाला होता.”**

Savitribai Phule Jayanti : ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चित्रपटाच्या टीमकडून जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

बॉक्स ऑफिस कलेक्शन

sacnilk च्या अहवालानुसार, ‘उत्तर’ सिनेमाने 20 दिवसात 2.25 कोटींची कमाई केली आहे. ‘उत्तर’ला मिळालेला हा प्रतिसाद आता अजूनच वाढताना दिसत आहे.

 

Web Title: Dhurandhar competitor uttar marathi movie box office collection more than 2 crores collected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • Box Office
  • marathi movie

संबंधित बातम्या

शिवकालीन इतिहासाचा गौरवशाली अध्याय उलगडणार; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
1

शिवकालीन इतिहासाचा गौरवशाली अध्याय उलगडणार; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटप्रेमींसाठी खास भेट! ९ जानेवारीपासून मुंबईत चित्रपट महोत्सवाची मेजवानी, ५० पेक्षा जास्त देशांच्या चित्रपटांचा समावेश
2

चित्रपटप्रेमींसाठी खास भेट! ९ जानेवारीपासून मुंबईत चित्रपट महोत्सवाची मेजवानी, ५० पेक्षा जास्त देशांच्या चित्रपटांचा समावेश

मराठी सिनेमाचा ऐतिहासिक क्षण, ऑस्करच्या दारात पोहोचला प्रभावळकरांचा ‘दशावतार’, मुख्य श्रेणी स्पर्धेत चित्रपटाची निवड
3

मराठी सिनेमाचा ऐतिहासिक क्षण, ऑस्करच्या दारात पोहोचला प्रभावळकरांचा ‘दशावतार’, मुख्य श्रेणी स्पर्धेत चित्रपटाची निवड

Savitribai Phule Jayanti : ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चित्रपटाच्या टीमकडून जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
4

Savitribai Phule Jayanti : ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चित्रपटाच्या टीमकडून जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.