(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या भारताच्या आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाच्या टीमने पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे भेट देत त्यांना अभिवादन केले. या वास्तूत त्या घडल्या आणि त्यांनी समाज सुधारण्याचा पाया रचला. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात घडवलेली क्रांती आणि मराठी शाळांचे जतन करण्यासाठी केलेला संघर्ष हाच या चित्रपटाचा आत्मा असल्याने, त्यांच्या जयंतीदिनी दिलेले हे अभिवादन अधिक अर्थपूर्ण ठरले. सध्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाला महाराष्ट्रभरातून भरभरून प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मराठी भाषा, मराठी माध्यमाच्या शाळा आणि शिक्षणाच्या मूल्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आजच्या काळात नव्याने अधोरेखित करतो.
वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२६ रोजी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने त्याच्या बेजटपेक्षा जास्त कमाई करून चाहत्यांचे मन जिंकले आहे. तसेच सोशल मीडियावर आणि सिनेमांबाहेर या चित्रपटाचीच चर्चा होताना दिसत आहे.
भारतीय मनोरंजन विश्वाला जागतिक उंची : Excel Entertainment–Universal Music Groupची भागीदारी
‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपटाच्या लेखक, दिग्दर्शकाचे आणि संपूर्ण कलाकारांचे कौतुक देखील प्रेक्षक करताना दिसत आहेत. हा चित्रपट मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत तरच मराठी मराठी भाषा जगेल असा संदेश देणारा आहे. हा संपूर्ण चित्रपट २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यता आला आहे. परंतु या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जास्त कोटींचा गल्ला करून, आपले बजेट वसूल करण्याच्या मार्गावर आहे . टेनवोच्या वृत्तानुसार, ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाने पहिल्याच दिवशी १८ लाखांची कमाई केली आहे. आणि जगभरात या चित्रपटाने २० लाखांचा गल्ला जमवला आहे.
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपट प्रदर्शित झाला असून यात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.






