Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘घबाडकुंड’मधून प्रितम पाटील यांचा नवा थरार; मराठीत पहिल्यांदाच सिनेमॅटिक युनिव्हर्सचा धाडसी प्रयोग

मराठीत पहिल्यांदाच ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’चा नवा प्रयोग प्रितम पाटील सेट करणार आहेत. ‘घबाडकुंड’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 07, 2026 | 03:16 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘घबाडकुंड’मधून प्रितम पाटील यांचा नवा थरार
  • मराठीत पहिल्यांदाच सिनेमॅटिक युनिव्हर्सचा प्रयोग
  • ‘घबाडकुंड’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

यवतमाळचा होतकरू आणि प्रयोगशील दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील पुन्हा एकदा आपल्या हटके शैलीत प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज आणि ‘खिचिक’, ‘डॉक्टर डॉक्टर’, ‘ढिशक्यांव’ यांसारख्या मराठी चित्रपटांद्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या दिग्दर्शकाने ‘अल्याड पल्याड’च्या यशानंतर आता ‘घबाडकुंड’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांना थरारक अनुभव देण्याचा निर्धार केला आहे.

‘घबाडकुंड’ हा केवळ एक चित्रपट नसून मराठी चित्रपटसृष्टीत ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’ची संकल्पना साकारण्याचा एक धाडसी प्रयत्न आहे. कल्पनेच्या पलीकडचं विश्व मोठ्या पडद्यावर उभं करण्याची तयारी या चित्रपटातून दिसून येते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ. रसिक कदम यांची साथ लाभली आहे.

‘हळदीत माखले’ गाण्याने लग्नसोहळ्यांत आणली रंगत; अभय जोधपूरकरच्या आवाजाने केली जादू

मराठी सिनेमात नव्या तंत्राचा आणि आशयाचा प्रयोग करणाऱ्या तरुण दिग्दर्शकांमध्ये प्रीतम एस. के. पाटील यांचं नाव विशेषत्वाने घेतलं जातं. पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन रहस्य, थरार आणि वेगळ्या संकल्पनांवर आधारित कथा सादर करण्याची त्यांची शैली प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ‘अल्याड पल्याड’सारख्या रहस्यमय थरारपटातून त्यांनी हॉरर-थ्रिलर प्रकाराला नवं रूप दिलं होतं आणि आता ‘घबाडकुंड’मधून तोच प्रयोग अधिक मोठ्या पातळीवर पाहायला मिळणार आहे.

हॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’ची संकल्पना मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरली असली, तरी मराठीत अशा प्रकारचा प्रयोग अत्यंत दुर्मीळ आहे. ‘घबाडकुंड’मुळे मराठी प्रेक्षकांना एक वेगळा, तांत्रिकदृष्ट्या समृद्ध आणि थरारक अनुभव मिळणार आहे. भय, रहस्य आणि थराराचा जबरदस्त मिलाफ असलेला हा चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी एक खास ‘स्पेशल ट्रीट’ ठरणार आहे.

११ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर डान्सचा जलवा; रेमो डिसूजा घेऊन येतोय ABCD 3,नव्या भागात कोणाची होणार एन्ट्री?

प्रीतम एस. के. पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन प्रयोग करण्याची परंपरा कायम राहिली आहे, मात्र थरारक आणि मसालेदार मनोरंजनासाठी प्रेक्षक अनेकदा हिंदी चित्रपटांकडे वळतात. हीच बाब लक्षात घेऊन ‘घबाडकुंड’मधून हॉरर जॉनरला ॲक्शन, इमोशन आणि ड्रामाचा अनोखा तडका देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘आयकॉन दी स्टाईल’ या निर्मितीसंस्थेअंतर्गत साकारलेला मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स असलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, प्रेक्षकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे.

Web Title: Ghabadkund marathi movie cinematic universe pretam patil release date 19 june

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

America Breaking :ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय
1

America Breaking :ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट
2

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी
3

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी

Captain Smit Machhar: ‘एअरलिफ्ट’च्या दिग्दर्शकाकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक; धैर्य आणि प्रसंगावधानाला केला सलाम
4

Captain Smit Machhar: ‘एअरलिफ्ट’च्या दिग्दर्शकाकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक; धैर्य आणि प्रसंगावधानाला केला सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.