Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

America Breaking :ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय

America Breaking : ट्रम्प यांच्या प्रशंसेच्या जाहिरातींवर सरकारी निधी खर्च झाल्याने अमेरिकेत वाद निर्माण झाला. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांकडून विरोध झाल्यानंतर ट्रम्प यांनी यापुढील जाहिरातींचा खर्च त्यांच्या PAC कडून केला जाईल, असे म्हटले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 06, 2026 | 06:19 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • सरकारी पैशातून जाहिराती केल्याने वाद
  • दोन्ही पक्षांकडून विरोध; ट्रम्प यांची भूमिका
  • सरकारी पैसा आणि राजकीय प्रचाराचा मुद्दा चर्चेत
America Breaking : ज्या पद्धतीने भारतात येणारे प्रत्येक सरकार ,सरकारी पैश्यातून तुफान जाहिरातबाजी करत असते . याचा हिशोब जनतेला मिळत नाही . याउलट अमेरिकेतील नागरिक आणि राजकीय पक्ष भारतापेक्षा जरा जास्तच जागरूक आहेत . आणि ते जागरूक आहेत म्हणूनच काय कि त्यांचा त्यांच्या नेत्यावर अंकुश असतो .

अमेरिकेत कोणीही कितीही ताकद ,पैसा पणाला लावला तरी जनतेच्या रेट्यासमोर त्याला झुकावेच लागते . हा अमेरिकेचा इतिहास आहे . कारण जे जगातील सर्वात जुनी लोकशाही म्हणून जगभर प्रचार करत असतात . याच संदर्भात आता अमेरिकेतून एक बातमी समोर येत आहे . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांची आणि कामगिरीची प्रशंसा करणाऱ्या जाहिरातींवर सरकारी निधीतून करण्यात आलेल्या खर्चावरून अमेरिकेत राजकीय वाद निर्माण झाला आहे.

या जाहिरातींसाठी करदात्यांच्या पैशांचा वापर करण्यात आल्याने रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. सरकारी निधीचा वापर एखाद्या राष्ट्राध्यक्षांच्या राजकीय प्रतिमेला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाऊ नये, अशी भूमिका विरोधकांकडून मांडण्यात आली. वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी आता अशा जाहिरातींचा खर्च त्यांच्या राजकीय कृती समितीकडून म्हणजेच PAC कडून केला जाईल, असे म्हटले आहे.

Pakistan Breaking : मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी

सरकारी पैशातून जाहिराती केल्याने वाद

ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांचे समर्थन करणाऱ्या जाहिराती विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या. या जाहिरातींमध्ये प्रशासनाची कामगिरी आणि ट्रम्प यांच्या निर्णयांचे कौतुक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, या जाहिरातींचा खर्च सरकारी निधीतून होत असल्याने त्यावर प्रश्न उपस्थित झाले.

करदात्यांकडून जमा होणारा पैसा सार्वजनिक कामांसाठी वापरला जावा, तो कोणत्याही राजकीय नेत्याच्या प्रसिद्धीसाठी वापरला जाऊ नये, अशी टीका करण्यात आली. विशेष म्हणजे या मुद्द्यावर केवळ डेमोक्रॅटिक पक्षाकडूनच नव्हे, तर रिपब्लिकन पक्षातील काही नेत्यांकडूनही आक्षेप नोंदवण्यात आल्याचे समोर आले.

दोन्ही पक्षांकडून विरोध; ट्रम्प यांची भूमिका

जाहिरातींच्या खर्चावरून वाढलेल्या दबावामुळे ट्रम्प यांनी यापुढे अशा जाहिरातींसाठी सरकारी निधीचा वापर करण्याऐवजी PAC कडून खर्च केला जाईल, असे स्पष्ट केले. PAC म्हणजे Political Action Committee. अमेरिकेतील राजकीय कृती समित्या राजकीय उद्दिष्टांसाठी निधी उभारू शकतात आणि प्रचाराशी संबंधित विविध उपक्रमांसाठी तो वापरू शकतात. त्यामुळे पुढील काळात ट्रम्प यांच्या समर्थनार्थ तयार होणाऱ्या जाहिरातींचा खर्च सरकारी यंत्रणेऐवजी त्यांच्या राजकीय निधीतून करण्याचा मार्ग स्वीकारला जाण्याची शक्यता आहे.

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट

सरकारी पैसा आणि राजकीय प्रचाराचा मुद्दा चर्चेत

या प्रकरणामुळे अमेरिकेत सरकारी निधी आणि राजकीय प्रचार यांच्यातील सीमारेषेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्राध्यक्षांच्या धोरणांची माहिती देण्यासाठी सरकारी जाहिराती करणे आणि एखाद्या नेत्याची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रचारात्मक जाहिराती करणे यात स्पष्ट फरक असावा, असा मुद्दा मांडला जात आहे.

विरोधकांच्या मते, करदात्यांच्या पैशांचा वापर राजकीय प्रसिद्धीसाठी होऊ नये. दुसरीकडे, प्रशासनाच्या धोरणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिराती आवश्यक असल्याचे समर्थकांचे म्हणणे असू शकते. मात्र, दोन्ही पक्षांकडून झालेल्या विरोधानंतर ट्रम्प यांनी खर्च PAC कडे वळवण्याची भूमिका घेतल्याने हा वाद सध्या काहीसा शांत होण्याची शक्यता आहे.

Web Title: Us breaking public funds used for trumps advertisements major decision taken following opposition from both partiescp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • America news
  • Donald Trump
  • Marathi Breaking news
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट
1

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी
2

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा
3

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
4

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.