
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘कलकी २८९८ एडी’च्या सिक्वेलमध्ये नाही दिसणार दीपिका पदुकोण? अभिनेत्रीचा मोठा निर्णय
केके फिल्म्स क्रिएशन, उप्स डिजिटल एंटरटेन्मेेंट यांनी “छबी” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जया तलक्षी छेडा या चित्रपटाचा निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत मसूरकर यांचं आहे. चित्रपटात ध्रुव छेडा, सृष्टी बाहेकर, अनघा अतुल, रोहित लाड, ज्ञानेश दाभाणे या नव्या दमाच्या कलाकारांसह समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडे, शुभांगी गोखले, राजन भिसे, संजय कुलकर्णी, लीना पंडित असे अनुभवी कलाकार काम करताना दिसणार आहेत.
“होय महाराजा” हे गाणं चित्रपटातील विवाहप्रसंगी होणाऱ्या हळदीच्या कार्यक्रमाचं आहे. सहजसोपे शब्द, ताल धरायला लावणारं संगीत, उत्तम नृत्य दिग्दर्शन या गाण्याला लाभलं आहे. त्यामुळे आता लग्न समारंभांमध्ये हे गाणं सहजपणे स्थान मिळवू शकणारं आहे यात शंका नाही. या चित्रपटाची कथा आता प्रेक्षक पाहण्यासाठी उत्सुक आहे.
फोटोग्राफी स्पर्धेसाठी एक तरूण फोटोग्राफराला फोटो पाठवायचे असतात. त्यासाठी तो कोकणात जातो. त्याने कोकणात जाऊन एका मुलीचे फोटो काढलेले असतात. प्रत्यक्षात त्या फोटोत कुणीच दिसत नाही. पण, त्या फोटोग्राफरला त्या फोटोत मुलगी दिसत असते. या फोटोमागे काय कहाणी आहे, ती मुलगी कोण आहे? या प्रश्नांची उत्तरं मोठ्या पडद्यावरच पाहायला मिळणार आहेत. निसर्गसंपन्न कोकणाच्या पार्श्वभूमीवरची एक गूढरम्य गोष्ट “छबी” या चित्रपटांतून मांडण्यात आली आहे.