Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bolavita Dhani Natak: हृषिकेश जोशींच्या ‘बोलविता धनी’ची जोरदार चर्चा, क्षितीश दाते साकारणार रंजक भूमिका

Kshitish Date Marathi Natak: नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीश दाते (Kshitish Date) याने आपल्या भूमिकेबद्दल आणि हृषिकेश जोशींसोबतच्या कामाच्या अनुभवाविषयी मोकळेपणाने संवाद साधला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 07, 2025 | 08:41 PM
हृषिकेश जोशींच्या 'बोलविता धनी'ची जोरदार चर्चा

हृषिकेश जोशींच्या 'बोलविता धनी'ची जोरदार चर्चा

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘बोलविता धनी’ नाटकाची जोरदार चर्चा
  • क्षितीश दाते साकारणार ‘कनिष्ठ’ पण रंजक भूमिका
  • “हृषिकेश जोशींनी विचारताच होकार दिला
Bolavita Dhani Natak: प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी (Hrishikesh Joshi) यांच्या आगामी ‘बोलविता धनी’ (Bolavita Dhani) या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात जोरदार चर्चा आहे. प्रवीण भोसले, भरत नारायणदास ठक्कर, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी आणि सुनंदा काळुसकर यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः हृषिकेश जोशी यांनी केले आहे. या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीश दाते (Kshitish Date) याने आपल्या भूमिकेबद्दल आणि हृषिकेश जोशींसोबतच्या कामाच्या अनुभवाविषयी मोकळेपणाने संवाद साधला.

दोन वेगळ्या भूमिका, ‘बोलविता धनी’ची संकल्पना

क्षितीश दातेने या नाटकात दोन अत्यंत वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तो सांगतो की, “या दोन्ही भूमिका एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. एकाच वेळी दोन वेगळी माणसं एकापाठोपाठ एक उभी करणं हे माझ्यासाठी थोडं आव्हानात्मक आहे.” ‘बोलविता धनी’ या शीर्षकाचा अर्थ नाटकात वेगवेगळ्या पद्धतीने लागतो. क्षितीशच्या मते, “बोलविता धनी म्हणजे बोलणारा किंवा कृती करणारा एक असतो, पण पडद्यामागे राहून त्याला सूचना देणारा दुसराच कोणी असतो.” विशेष म्हणजे, लोकमान्य टिळक किंवा एकनाथ शिंदे यांसारख्या नेतृत्वादी व्यक्तिरेखांच्या तुलनेत या नाटकात त्याची भूमिका कनिष्ठ पदाची आहे, पण अभिनेता म्हणून हेच आव्हान अधिक रंजक असल्याचे तो मानतो.

हे देखील वाचा: girija oak: नॅशनल क्रशचे साडी कलेक्शन चर्चेत; “ही साडी तर किडनीच्या किंमतीइतकी!”,तर काही 50-60 वर्ष आहेत जुन्या

हृषिकेश जोशींसोबतचा अनुभव

हृषिकेश जोशींसोबत काम करण्याच्या अनुभवावर क्षितीश दाते खूप उत्साही आहे. “मला हृषिकेश जोशींचं लिखाण प्रचंड आवडतं. त्यांची सगळी नाटकं मी पाहिली आहेत. शिवाय सध्या सुरू असलेल्या ‘मी व्हर्सेस मी’ या नाटकातही आम्ही एकत्र काम करतोय. त्यामुळे त्याने मला या नाटकासाठी फोन केला, तेव्हा मी काहीही विचार न करता लगेच हो बोलून टाकलं.” हृषिकेश यांच्या निवडक विनोदी शैलीमुळे हे नाटक सहकुटुंब पाहता येईल असे आहे. क्षितीश म्हणाला की, हृषिकेशने १३ जणांची ही संपूर्ण टीम एकत्र आणली आहे; त्यांची कलाकार निवडीची पारख खूप चांगली आहे. हे नाटक “कोणाच्याही खिजगणतीत नाही अशा जुन्या नाटकांच्या इतिहासातल्या एका महत्त्वाच्या प्रसंगावरती भाष्य करतं.”

या नाटकात ओंकार कुलकर्णी, संग्राम साळवी यांच्यासह एकूण १३ कलाकार आहेत. १३ जणांना एकत्रित पाहण्याची मजा रसिकांना नक्कीच अनुभवायला मिळेल आणि ‘बोलविता धनी’ हे नाटक नाट्यरसिकांसाठी १०० टक्के पर्वणी असेल, असा विश्वास क्षितीश दातेने व्यक्त केला.

प्रयोगाचे वेळापत्रक

  • पुण्याचा शुभारंभाचा प्रयोग: १३ डिसेंबर, रात्री ९.३० वाजता, बालगंधर्व रंगमंदिर.
  • मुंबईचा शुभारंभाचा प्रयोग: २४ डिसेंबर, दुपारी ४ वाजता, दिनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले.

हे देखील वाचा: पोलिसाच्या वर्दीत दिसणार सुबोध भावे, ‘कैरी’ चित्रपटात अभिनेत्याची लक्षवेधी भूमिका!

Web Title: Hrishikesh joshis bolvita dhani is hotly discussed kshitish date will play an interesting role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 08:39 PM

Topics:  

  • marathi cinema

संबंधित बातम्या

girija oak: नॅशनल क्रशचे साडी कलेक्शन चर्चेत; “ही साडी तर किडनीच्या किंमतीइतकी!”,तर काही 50-60 वर्ष आहेत जुन्या
1

girija oak: नॅशनल क्रशचे साडी कलेक्शन चर्चेत; “ही साडी तर किडनीच्या किंमतीइतकी!”,तर काही 50-60 वर्ष आहेत जुन्या

पोलिसाच्या वर्दीत दिसणार सुबोध भावे, ‘कैरी’ चित्रपटात अभिनेत्याची लक्षवेधी भूमिका!
2

पोलिसाच्या वर्दीत दिसणार सुबोध भावे, ‘कैरी’ चित्रपटात अभिनेत्याची लक्षवेधी भूमिका!

राज्य शासनाने केला तेजश्री प्रधानचा सन्मान; सांस्कृतिक युवा पुरस्कार मिळवल्यानंतर अभिनेत्री भावुक
3

राज्य शासनाने केला तेजश्री प्रधानचा सन्मान; सांस्कृतिक युवा पुरस्कार मिळवल्यानंतर अभिनेत्री भावुक

मराठी शाळांची आठवणी ताजे करणारं ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ मधील गाणं ‘शाळा मराठी’ प्रदर्शित!
4

मराठी शाळांची आठवणी ताजे करणारं ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ मधील गाणं ‘शाळा मराठी’ प्रदर्शित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.