
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
फॅशन, अभिनय आणि नृत्य यामुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. काही महिन्यांपासून तिने स्वतःची कलाकृती असलेल्या “संभावामि युगे युगे” या डान्स ड्रामाची निर्मिती केली आणि आता तिचा भरतातला पहिला वहिला शो पुण्यात संपन्न झाला. कृष्णाची विविध रूपं त्याची लीलया असलेला हा संपूर्ण डान्स ड्रामा परदेशात सुद्धा हाऊसफुल्ल झाला आणि पुण्यातल्या प्रेक्षकांचं देखील त्यानं मन जिंकून घेतलं आहे.
“संभावामि युगे युगे” शोची संकल्पना, निर्मिती दिग्दर्शन आणि कोरिओग्राफी संस्कृतीने स्वतःच केले असून हा डान्स ड्रामा आता भारतात देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. संस्कृतीने आजवर इंडस्ट्रीत अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे आणि आता ती या नव्या रुपात प्रेक्षकांना मोहित करताना बघायला मिळणार आहे.
नुकताच भरतातातला “संभावामि युगे युगे” चा पहिला वहिला हाऊसफुल्ल शो पुण्यात संपन्न झाला. संस्कृतीने साकारलेल्या श्री कृष्णाच्या रूपाने प्रेक्षक सुद्धा भारावून गेले. या बद्दल बोलताना संस्कृती म्हणाली, “आम्ही संभावामि युगे युगेचा पहिला शो दुबईत केला तिथला प्रेक्षक वर्ग हा संपूर्ण वेगळा होता पण पुण्यात जेव्हा आपल्या मातीत हा शो करायचं ठरलं तेव्हा थोड दडपण आलं. आजवर इथल्या रसिक प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक भूमिकेला खूप प्रेम दिलं आणि त्याहून जास्त प्रेम त्यांनी संभावामि युगे युगे मधल्या माझ्या श्री कृष्णाच्या भूमिकेला दिलं.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मी साकारलेली श्री कृष्णाची वेगवेगळी रूपं बघून त्यांना सुद्धा वेगळा अनुभव आला. काही प्रेक्षकांनी शो नंतर येऊन सुंदर प्रतिक्रिया दिल्या तर काही प्रेक्षक येऊन चक्क माझ्या पाया पडत होते. एका आजोबांनी येऊन मला सांगितलं या शो मुळे आम्हाला कृष्ण अजून जवळवून अनुभवता आला तर एका आजी नी हा शो जागतिक दर्जाचा आहे एवढी मोठी पोचपावती दिली. स्वतःच्या होम ग्राउंड मध्ये स्वतःने निर्मिती केलेली कलाकृती सादर करण्याची धाकधूक असताना पुणेकरानी दिलेलं प्रेम, पाठिंबा बघून खूप मी भारावून गेले.’ असे संस्कृती म्हणाली.
दुबई पासून सुरु झालेला “संभावामि युगे युगे” चा हा प्रवास आता भारतात देखील वेगेवगळ्या ठिकाणी येऊन पोहचणार आहे यात शंका नाही. आगामी काळात अभिनेत्री संस्कृती बालगुडे अनेक वैविध्यपूर्ण भूमिका मध्ये दिसणार असल्याचं समजलं आहे. तसेच संस्कृतीचे नवनवीन चित्रपट पाहण्यासाठीही तिचे चाहते उत्सुक आहेत.