Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एचपीव्ही लसीकरण मोहिमेत ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमचा सहभाग; महिला दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीचा संदेश

स्त्री सशक्तीकरणाचा संदेश देणाऱ्या ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे आयोजित आरोग्य जनजागृतीचा संदेशचा संदेश दिला. त्यांनी सर्व्हायकल कॅन्सर तपासणी आणि एचपीव्ही लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 04, 2026 | 11:23 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एचपीव्ही लसीकरण मोहिमेत ‘तिघी’च्या टीमचा सहभाग
  • महिला दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीचा संदेश
  • ‘तिघी’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
स्त्रीच्या भावविश्वाचा, तिच्या स्वाभिमानाचा आणि तिच्या अंतर्गत ताकदीचा वेध घेणाऱ्या ‘तिघी’ या चित्रपटाचे महाराष्ट्रभर जोरदार प्रमोशन सुरू आहे. आई-मुलींच्या नात्याची कथा सांगणारा हा चित्रपट केवळ नात्यांचा प्रवास नाही, तर स्त्री सशक्तीकरणाचा ठाम संदेश देणारा आहे. याच विचारांशी सुसंगत पाऊल टाकत ‘तिघी’ची टीम पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या सर्व्हायकल कॅन्सर तपासणी आणि एचपीव्ही लसीकरण मोहिमेत सहभागी झाली आहे.

BO Collection: होळीच्या सुट्टीचा ‘The Kerala Story 2’ ला मोठा फायदा; बॉक्स ऑफिसवर केली बंपर कमाई

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त २ मार्च ते ८ मार्चदरम्यान रुग्णालयात महिलांसाठी विशेष तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली आहे. ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लहान वयात दिले जाणारे हे लसीकरण भविष्यात सर्व्हायकल कॅन्सरपासून संरक्षण देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. प्रत्येक आईने आपल्या मुलीच्या आरोग्याबाबत सजग राहून योग्य वेळी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, हा या उपक्रमामागील प्रमुख संदेश आहे. आई आपल्या मुलीला देऊ शकणारी सर्वात मोठी भेट म्हणजे उत्तम आरोग्य, आणि वेळेवर केलेले लसीकरण ही त्या सुरक्षिततेची सुरुवात आहे, हा विचार अधोरेखित करण्यात आला आहे.

महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करणे, सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधाबाबत माहिती देणे आणि एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात ‘तिघी’ चित्रपटातील नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी आणि दिग्दर्शिका जिजीविषा काळे यांनी सक्रिय सहभाग घेत महिलांना स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संदेश दिला.

‘तिघी’ या चित्रपटात तीन स्त्रिया आपल्या आयुष्यातील संघर्षांना सामोऱ्या जात स्वतःची ओळख निर्माण करतात. स्वतंत्र व्हा, सक्षम व्हा आणि स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहा, हा संदेश या मोहिमेतूनही देण्यात आला आहे. स्त्री ही केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी नाही, तर स्वतःच्या आयुष्याचीही ती समान भागीदार आहे, हा विचार अधोरेखित करण्यात आला आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेत्री नेहा पेंडसे म्हणाली, “आपण घरासाठी आणि कुटुंबासाठी खूप काही करतो, पण स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. ‘तिघी’मध्ये आम्ही ज्या सशक्त स्त्रियांची कथा मांडतो, त्याचप्रमाणे प्रत्येक आईने आपल्या मुलीच्या भविष्यासाठी आरोग्यदृष्ट्या सजग राहणे गरजेचे आहे. योग्य वयात लसीकरण ही तिच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची पायरी आहे.”

“माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न…”, ‘धुरंधर’ फेम आयेशा खानचा मोठा खुलासा; सेटवरील स्पॉटबॉयने केले धक्कादायक कृत्य

तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, “स्वावलंबन म्हणजे फक्त आर्थिक स्वातंत्र्य नाही, तर आरोग्याबाबत जागरूक असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. महिलांनी स्वतःची काळजी घेणे ही स्वार्थाची नव्हे तर सामर्थ्याची खूण आहे. ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण ही भविष्यासाठीची सुरक्षित गुंतवणूक आहे. आई-मुलीचे नाते जसे जपले जाते, तसेच त्यांच्या आरोग्याचे संरक्षणही जपले गेले पाहिजे.”

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शिका जिजीविषा काळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.

Web Title: Tighi marathi movie team support hpv vaccination campaign womens day special

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ यांचे ‘हे’ ५ TOP सुपरहिट कॉमेडी चित्रपट, जे पाहून तुम्ही आजही खळखळून हसाल
1

Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ यांचे ‘हे’ ५ TOP सुपरहिट कॉमेडी चित्रपट, जे पाहून तुम्ही आजही खळखळून हसाल

Lagaan Re-Release: आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण! ‘या’ दिवशी पुन्हा थिएटर्समध्ये होणार रिलीज, नवा ट्रेलर आउट
2

Lagaan Re-Release: आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण! ‘या’ दिवशी पुन्हा थिएटर्समध्ये होणार रिलीज, नवा ट्रेलर आउट

B Town मध्ये लग्नसराई सुरु! आमिर खान तिसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात! ‘या’ तारखेला बांधणार लग्नगाठ
3

B Town मध्ये लग्नसराई सुरु! आमिर खान तिसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात! ‘या’ तारखेला बांधणार लग्नगाठ

हरवलेली मुलगी, मृतदेह अन्.., मनाचा थरकाप उडवणारा ‘दृश्य अदृश्य’चा अधिकृत ट्रेलर रिलीज, चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
4

हरवलेली मुलगी, मृतदेह अन्.., मनाचा थरकाप उडवणारा ‘दृश्य अदृश्य’चा अधिकृत ट्रेलर रिलीज, चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.