Lakhat Ek Amacha Dada Serial On Zee Marathi : झी मराठी वाहिनीवरील “लाखात एक आमचा दादा” मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेचं कथानक आणि कलाकारांनी खूप कमी दिवसांत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. या मालिकेने वर्षभरात प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेतील बहिणींमधील सर्वात हुशार बहिण अशी जिची ओळख आहे अशी, तेजू म्हणजेच अभिनेत्री कोमल मोरे हिने मालिकेतील कलाकार आणि सूर्या दादा म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण यांच्य़बद्ल एक भावनिक पोस्ट केली आहे.
मालिकेतील कलाकारांनी जे मला सांभाळून घेतलं मला मार्गदर्शन केलं त्याबाबत मानावे तेवढे आभार कमी आहेत. तेजू ही व्यक्तीरेखा कायमच माझ्या जवळची राहिल असं देखील कोमल म्हणाली. पुढे अभिनेत्री असं देखील म्हणाली की, आता अधिकृतपणे निरोप घ्यायला हरकत नाही. खरंतर ती वेळ आली आहे. आजवर मालिकेत अनेक चांगले वाईट क्षण आलेत, मालिकेतील व्यक्तिरेखांच्या आयुष्यात आलेल्या चढउताराचे प्रेक्षक साक्षीदार आहेत. सूर्या, त्याच्य़ा चार बहिणी आणि त्याची पत्नी तुळजा यांच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा आव्हानं संकट आली तेव्हा तेव्हा प्रेक्षक देखील रडले आणि जेव्हा जेव्हा सुखाचे क्षण आले तेव्हा तेव्हा प्रेक्षक देखील हसले.
मालिकेतील नायक आणि नायिकांनी नाही तर खलनायक आणि खलनायिकेने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली.सतत कट कारस्थान करणारे डॅडी व शत्रू, वर्षानुवर्षे डॅडींचा अन्याय सहन करणाऱ्या शालन-मालन, डॅडींच्या कपटी वागण्यामुळे कित्येक वर्षे तुरुंगवास भोगणारी आशा म्हणजेच सूर्याची आई, बायको पुजाऱ्याबरोबर पळून गेल्याचे समजल्यानंतर व्यसनामध्ये स्वतःला गुंतवणारे तात्या, वेळोवेळी सूर्याला मदत करणारे त्याचे जीवाभावाचे मित्र काजू व पुड्या ही आणि मालिकेतील इतर पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर स्वत:चा ठसा उमटवला आहे. म्हणतात ना शेवट गोड तर सारंच गोड तसं मालिकेच्या अंतिम भागात झालं. अखेर डॅडींचं इतक्या वर्षाचं सत्य उघड झालं आणि त्यांच्या पापांची शिक्षा त्यांना मिळाली. अखेर सूर्याला त्याच्या हक्काचं घर मिळालं आँणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला.
शुटींगच्या निमित्ताने दिवसाचे कित्येक तास आपण सहकारांसोबत असतो. त्यामुळे नकळतपणे आपलं त्यांच्याशई घट्ट नातं तयार होतं. मालिकेतील दादा म्हणता म्हणता तू खऱ्या आयुष्यात देखील लाखात एक दादा झालास आणि कायमत असशील असं सूर्या दादा म्हणजेच अभिनेता नितिश चव्हाणबद्दल कोमलने सांगितलं आहे. त्याचबोरबर कोमल म्हणाली की, गिरिश ओक अनुभवी कलाकार असून देखील त्यांनी किती सांभाळून घेतलं. त्याचं मार्गदर्शन कायमच मोलाचं ठरलं आहे. असं देखील कोमल म्हणाली आहे.