Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin Chandwade :अभिनेता सचिन चांदवडेची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना उचलं टोकाचं पाऊल

जळगाव जिल्ह्यात उंदिरखेडे गावात धक्कादायक घटना, असुरवन’ चित्रपटातील अभिनेता सचिन चांदवडेने गळफास घेऊन संपवलं जीवन

  • By अमृता यादव
Updated On: Oct 27, 2025 | 01:13 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे येथे एका २५ वर्षीय होतकरू अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. सचिन गणेश चांदवडे असे २५ वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. सचिनच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलं नाही. परंतु या घटनेमुळे मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सचिनच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सचिनचा आगामी सिनेमा ‘असुरवन’ हा लवकरच प्रदर्शित होणार होता. परंतु सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना सचिनने स्वतःचं जीवन संपवल्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

अभिनेता सचिन गणेश चांदवडे याने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.ही घटना २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता उघडकीस आली. घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी सचिनला खाली उतरवून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू ठेवले, पण त्याची मृत्यूशी झुंज अखेरीस अपयशी ठरली.२४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री दीड वाजता उपचारादरम्यान सचिनचा मृत्यू झाला.

जुलै-ऑगस्टमध्येच झाला निर्णय! TV जगतातील ‘ही’ लोकप्रिय जोडी होणार १५ वर्षांनी वेगळी, अखेर अफवांना पूर्णविराम; सत्य आले समोर

सचिन पुण्यातील आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर काम करत होता. अभिनयाची आवड असल्याने त्याने सिनेमात करिअर करण्याचा निर्णय घेतला. नोकरीतून वेळ काढत सचिनने विविध कलाकृतींमध्ये अभिनय केला. त्याने नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित ‘जमतारा २’ वेबसीरिजमध्येही काम केलंय. याशिवाय कलावंत ढोल ताशा पथकात तो सक्रीय होता. जळगावमधील उभरता कलाकार म्हणून सचिनचं कौतुक व्हायचं. परंतु सचिनच्या आत्महत्येने सर्वांना धक्का बसला आहे..

‘Chhaava’ चा लवकरच तुटणार रेकॉर्ड, ‘Kantara Chapter 1’ चा धुमाकूळ; रविवारी एवढ्या कोटींचे कलेक्शन

Web Title: Marathi actor sachin chandwade ends life in jalgaon ahead of asurvan movie release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi movie
  • Sucide News

संबंधित बातम्या

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
1

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
2

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं
3

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?
4

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.