Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेता प्रसाद ओक यांच्या प्रयत्नांना यश…!!! मराठी चित्रपटांना मिळणार हे नवं अनुदान

महाराष्ट्रातील ऐतिहासिक सामाजिक , शैक्षणिक कला आणि क्रीडा विश्वातील व्यक्तींच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट / मातहतीपट / लघुपट यांना सहाय्यक अनुदान यंदाच्या वर्षापासून अडीच कोटी (२.५० cr ) इतकी रक्कम मिळणार आहे. अभिनेता - दिग्दर्शक प्रसाद ओक आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी या गोष्टीचा वारंवार मागोवा केल्या नंतर आज नव्या मागणी नुसार अडीज करोड एवढं अनुदान मिळणार असल्याचं समजले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 16, 2024 | 02:12 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटांना योग्य ते अनुदान मिळावं यासाठी प्रसाद ओक आणि महेश कोठारे यांनी कठोर प्रयत्न करून महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून सात करोड इतकी रक्कम मिळावी अशी मागणी केली होती आणि आजच्या नव्या माहिती नुसार महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी सिनेमाना तब्बल २.५० करोड रुपये अनुदान देण्यात यावं यावर शिक्कमोर्तब केला आहे. अनेकदा सरकारकडे पाठपुरावा करून ही रक्कम आता मराठी चित्रपटनिर्मिती साठी मिळणार आहे. वर्षभरात ३ चित्रपटांना अडीज कोटी रुपयांची मदत मिळणार असल्याचं आज जाहीर झाले आहे.

आपल्या मराठी सिनेमासाठी हक्काने लढणाऱ्या अभिनेता प्रसाद ओक यांच्या या कृतीचा सगळ्यांना अभिमान तर आहे पण आता हे अनुदान योग्य तऱ्हेन कसं वापरता येईल यावर देखील चर्चा लवकरच होणार आहे. प्रसाद ओक हे कायम मराठी चित्रपटांना योग्य न्याय मिळावा यासाठी वारंवार भाष्य करताना दिसले आहेत आणि आजची ही गोष्ट मराठी चित्रसृष्टीसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. प्रसाद ओक आधीपासून या कमिटी वर आहेत आणि कायम मराठी इंडस्ट्रीसाठी काय वेगळं करता येईन याकडे त्यांचा कल असताना आज मराठी सिनेमाला हे नवं अनुदान मिळवण्यासाठी त्यांनी कायम सरकारकडे पाठपुरावा देखील केला होता.

प्रसाद ओक या बद्दल बोलताना म्हणाले “‘गेली अनेक वर्ष मनोरंजनसृष्टीत काम केल्यानंतर अलीकडच्या वर्षात सिनेदिग्दर्शक आणि आता निर्मिती सुरु केल्यांनतर सिनेनिर्मिती आर्थिक बाजू अधिक जवळून अभ्यासता आली. दरम्यान सांस्कृतिक विभाकडून सिनेमांना मिळणारे तीस-पन्नास लाखांचे मिळणारे अनुदान अपुरे आहे हे निदर्शनास आले. आजचे सिनेमांचे निर्मिती मूल्य हे कोटीं रुपयांच्या घरात आहे. यासंदर्भात अलीकडच्या वर्षात आम्ही सांस्कृतिक मंत्रांशी चर्चा करत होतो. त्यांनतर सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी पुढाकार घेऊन आमची समिती नेमली ज्यात मी आणि ज्येष्ठ दिग्दर्शक महेश कोठारे होते.’ असे ते म्हणाले.

पुढे अभिनेता म्हणाला, ‘कला, क्रिडा, साहित्य, राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या जीवनपटासाठी शासनाने अनुदानाची मोठी द्यावी अशी शिफारस आम्ही केली. एका सिनेमासाठी ती रक्कम ७.५ कोटी रुपये इतकी असावी असा आमचा विचार होता. या शिफारशींवर विचार करुन शासनाने शासन निर्मिती सिनेमांसाठी १० कोटी आणि खाजगी सिनेनिर्मिती संस्थेस २.५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहेत. हा निर्णय स्वागताहार्य आहे. जेणेकरून उच्चतम, दर्जेदार मराठी सिनेमांची निर्मिती होईल. यातून सकस दर्जाचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येतील. या मराठी सिनेमांच्या हितकार्यात मला खारीचा वाटा उचलता आला याचा मला आनंद आहे” असे प्रसाद ओकन यांनी सांगितले.

कायम मराठी चित्रपटांना आणि प्रेक्षकांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळाव यासाठी चर्चेत राहून काम करून प्रसाद ओक यांनी सरकारला अनेकदा विनंती करून त्यांचा पाठपुरावा केला आहे आणि म्हणून आजच्या या नव्या अनुदानाच श्रेय हे प्रसाद ओक यांना जाते आहे. महाराष्ट्र शासनाने हे नव अनुदान देऊन नक्कीच मराठी चित्रपटांसाठी एक वेगळा स्टँड घेतला आहे यात महाराष्ट्र सरकार सोबतीने सांस्कृतिक मंत्री आदरणीय सुधीर मुनगंटीवार सर यांच्या सक्रिय सहभागाने कलाकारांच्या मागण्या समजून घेऊन सबंध मराठी चित्रपट सृष्टीसाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

हे देखील वाचा- श्रद्धा कपूरचा सिंपल- डिंपल अंदाज; नव्या फोटोंमध्ये दिसतेय खास!

प्रसाद वैविध्यपूर्ण भूमिका साकारत असताना त्यांच्या या नव्या भूमिकेचं तोंड भरून कौतुक होत आहे. ही गोष्ट फक्त मराठी चित्रपटांसाठी नाही तर संपूर्ण मराठी इंडस्ट्रीसाठी महत्वपूर्ण आहे आणि म्हणून प्रसाद ओक यांनी वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा करून आज मराठी सिनेमासाठी नव अनुदान मिळवून दिले आहे.

Web Title: Marathi films will get grant of rights success of actor prasad oak efforts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 12:18 PM

Topics:  

  • mahesh manjrekar
  • prasad oak

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.