फोटो सौजन्य: Raj More (Facebook)
मराठी चित्रपट शिवरायांवर अनेक चित्रपट आले. त्यातीलच काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला कमावला. मात्र, आता असा एक मराठी चित्रपट आला ज्यामुळे वाद पेटला आहे. या चित्रपटाचे नाव ‘खालिद का शिवाजी’.
काही दिवसांपूर्वी ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. हा ट्रेलर रिलीज झाल्यांनतर अनेकांनी या चित्रपटावर आपली मिश्र प्रतिक्रिया दिली. मात्र, वाद तेव्हा निर्माण झाला जेव्हा चित्रपटातील काही डायलॉग्स व्हायरल होऊ लागले.
खालिद का शिवाजी हा चित्रपट खालिद नावाच्या एका मुलावर बेतलेला आहे. शाळेत तो मुसलमान असल्याकारणाने त्याचे मित्र त्याला अफजल खान नावाने चिडवत असतात. यामुळे मग छोट्या खालिदच्या मनात शिवाजी महाराजांविषयी काही प्रश्न उद्भवतात, ज्याची उत्तरं तो शोधायचा प्रयत्न करत असतो.
प्रकाश राजने युट्यूबर्सवरील हल्ल्याचा केला निषेध, म्हणाले ‘या गुंडांमुळे धार्मिक स्थळे बदनाम आहेत…’
या ट्रेलरमध्ये तो काही प्रश्न विचारताना दिसत आहे, तसेच काही संवाद देखील आहेत, ज्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी होताना दिसत आहे. हे वादग्रस्त संवाद पुढीलप्रमाणे आहेत.
हिंदू संघटनांनी वरील संवादामागील ऐतिहासिक कागदपत्र किंवा पुरावा सादर करा, अशी मागणी केली आहे. तसेच हा चित्रपट इतिहासाचे विकृतीकरण करतो असाही आरोप या संघटनांनी केला आहे.
60 आणि 61 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरु असताना काही संघटनेच्या लोकांनी या चित्रपटविरुद्ध घोषणा दिल्या. अशातच, आता चित्रपटाच्या टीमने त्या वादग्रस्त संवादांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
चित्रपटाच्या टीमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक डॉक्युमेंट शेअर केला आहे, ज्यात त्यांनी चित्रपटातील वादग्रस्त संवादावर स्पष्टीकरण दिले आहे. सर्वात पहिले त्यांनी महाराजांच्या सैन्यात 35 टक्के सैन्य मुस्लिम होते का? याबाबत आपली भूमिका मांडली आहे.
हनी सिंग आणि करण औजला वर कारवाईची मागणी, गाण्यात आक्षेपार्ह भाषेमुळे निर्माण झाली समस्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात 31 टक्के मुसलमान होते आणि त्यांचे अंगरक्षक मुस्लीम समाजाचे होते, याबाबत हे प्रामाणिकपणे मान्य करावे लागेल की चित्रपटात देण्यात आलेली संख्या ही ऐतिहासीक कागदपत्रांच्या आधारे नाही. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात कतृत्व बघून संधी दिली जात असल्याने त्यांनी सैन्याची जाती-धर्माच्या आधारावर शिरगणती केली नाही. त्यामुळे त्यांचं एकुण सैन्य किती आणि त्या एकुण सैन्यात कुठल्या जाती धर्माचे किती लोक होते हे सांगणं निव्वळ अशक्य. आम्ही चित्रपटातील पात्राच्या तोंडी दिलेल्या संख्येपेक्षा तो आकडा जास्तही असु शकतो किंवा कमी देखील. मात्र छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम नव्हतेच हे म्हणणे देखील अनैतिहासीकच आहे.
पुढे चित्रपटाची टीम म्हणते,” आम्ही विनंती करतो की १२० मिनीटाच्या चित्रपटाविषयी ३ मिनीटाचा ट्रेलर पाहून टीका करू नका. आम्हाला खात्री आहे की हा चित्रपट पाहिल्यावर आपल्याला तो नक्की आवडेल, चित्रपट बघितल्यावरही तो आवडला नाही तर मात्र नक्की टिका करा.