(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कर्नाटकातील धर्मस्थळ मंदिर नगरीत मृतदेहांचे सामूहिक दफन करण्याच्या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु आहे. तसेच कर्नाटकातील या धर्मस्थळी येथे कव्हरेजसाठी आलेल्या युट्यूबर्सवर काल बुधवारी हल्ला झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अभिनेते प्रकाश राज यांनी धर्मस्थळावरील हल्ल्याच्या या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आणि स्वतःचा संताप व्यक्त केला आहे. अभिनेता या प्रकरणी नक्की काय म्हणाला हे आपण आता जाणून घेणार आहोत.
Bigg Boss 19 मध्ये नवा ट्विस्ट! Democrazy ने भरलेला असेल नवा सिझन, पहा Promo
प्रकाश राज यांनी हल्ल्याचा केला निषेध
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, बुधवारी संध्याकाळी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील धर्मस्थळाजवळ एका जमावाने तीन युट्यूबर्स आणि एका कॅमेरामॅनवर हल्ला केला. पोलिस सूत्रांनी सांगितले की त्यांच्यावर धर्मस्थळाची बदनामी केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता प्रकाश राज म्हणाले की, ‘धर्मस्थळामधील सौजन्य हत्याकांडासाठी न्याय मागणाऱ्या पत्रकारांवर हल्ला करण्यात आला, जो निंदनीय आहे’. असे अभिनेता म्हणाला आहे.
ಧರ್ಮಸ್ಥಳದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರ ಮೇಲಿನ ಹಲ್ಲೆ ಖಂಡನಾರ್ಹ.. ಇಂತಹ ಗೂಂಡಾಗಳಿದಲೇ ಭಕ್ತಾದಿಗಳು ನಂಬುವ ಧರ್ಮಸ್ಥಳಕ್ಕೆ ಕಳಂಕ ಬಂದಿರುವುದು.. ಸೌಜನ್ಯಾಳ ದಾರುಣ ಹತ್ಯೆಗೆ ನ್ಯಾಯ ಕೇಳಿದರೆ ಇವರಿಗೇಕೆ ಕೋಪ.. ದಯವಿಟ್ಟು ಬಂಧಿಸಿ ಸತ್ಯ ಹೊರತನ್ನಿ #justasking #DharmasthalaHorror #justiceforsoujanya pic.twitter.com/LwOxL3UZkG
— Prakash Raj (@prakashraaj) August 6, 2025
अभिनेत्याने उपस्थितीत केला प्रश्न
प्रकाश राज पुढे म्हणाले, ‘या गुंडांमुळे धर्मस्थळाची बदनामी होत आहे. जेव्हा या गुंडांना विचारले जाते की सौजन्याचा मृत्यू इतका दुःखद का झाला, तेव्हा त्यांना काय समस्या आहे? यामुळे ते हे का करत आहेत आणि यामागे कोण आहे याबद्दल शंका वाढते.’ असे म्हणून अभिनेत्याने प्रश्न उपस्थित केले आहे. प्रकाश राज यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हनी सिंग आणि करण औजला वर कारवाईची मागणी, गाण्यात आक्षेपार्ह भाषेमुळे निर्माण झाली समस्या
अभिनेत्याने केली न्यायाची मागणी
प्रकाश राज यांनी पोलिसांना कारवाई करण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले आहे की, ‘मी पोलिसांना विनंती करतो की त्यांनी या गुंडांना अटक करावी आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न करावा. लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की सत्य आणि न्याय मिळवणे हा आपला हक्क आहे’. असे अभिनेता व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. २०१२ मध्ये धर्मस्थळ शहरात महाविद्यालयीन विद्यार्थिनी सौजन्या मृतावस्थेत आढळली. अलिकडच्या आठवड्यात, विशेषतः सोशल मीडियावर, या प्रकरणात न्यायाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राज्य सरकारने स्थापन केलेले विशेष तपास पथक (एसआयटी) गेल्या दोन दशकांपासून धर्मस्थळात सामूहिक हत्या, बलात्कार आणि बेकायदेशीर दफन करण्याच्या आरोपांची चौकशी करत आहे.