
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपट आणि कलाकार सध्या मराठी चित्रपटांना उंचावण्यासाठी झटत आहेत. तसेच, याचे यश देखील त्यांना मिळत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२६ रोजी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने त्याच्या बेजतपेक्षा जास्त कमाई करून चाहत्यांचे मन जिंकले आहे. तसेच सोशल मीडियावर आणि सिनेमांबाहेर या चित्रपटाचीच चर्चा होताना दिसत आहे.
चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई
‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपटाच्या लेखक, दिग्दर्शकाचे आणि संपूर्ण कलाकारांचे कौतुक देखील प्रेक्षक करताना दिसत आहेत. हा चित्रपट मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत तरच मराठी मराठी भाषा जगेल असा संदेश देणारा आहे. हा संपूर्ण चित्रपट २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यता आला आहे. परंतु या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जास्त कोटींचा गल्ला करून, आपले बजेट वसूल करण्याच्या मार्गावर आहे . टेनवोच्या वृत्तानुसार, ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाने पहिल्याच दिवशी १८ लाखांची कमाई केली आहे. आणि जगभरात या चित्रपटाने २० लाखांचा गल्ला जमवला आहे.
| दिवस पहिला कलेक्शन | |
|---|---|
| ०१ जानेवारी २०२६ | १८ लाख |
| जगभरातील एकूण कमाई | २० लाख |
काय आहे चित्रपटाची कथा?
‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ या चित्रपटातून मराठी भाषेचे महत्त्व, आजची शिक्षणव्यवस्था आणि सामाजिक वास्तव या विषयांवर भर टाकणारा चित्रपट आहे. तसेच हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता प्रेक्षकांना विचार करायला भाग पडत आहे. त्यामुळेच चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर जगभरात या चित्रपटाला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट
‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, निर्मिती सावंत आणि मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच पदार्पण करणारी लोकप्रिय युट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट पाहायला पाहायला मिळाली आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून, क्षिती जोग निर्माती आहे. सहनिर्माते म्हणून विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ यांनी जबाबदारी सांभाळली आहे. तसेच, आता या चित्रपट पुढे प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.