स्टार प्रवाहवर सध्या नव्य़ा मालिकांची नांदी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. विविध आषयाच्या मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर येत असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेली हळद रुसी कुंकू हसलं या मालिकेतील कलाकरांना प्रेक्षकवर्ग भरभरुन प्रेम देत आहेत. अशातच आता पुन्हा एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवर नवी मालिका सुरु होणार असून या मालिकेत अजय पूरकर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नशीबवान असं या येणाऱ्या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत अजय पूरकर यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. कोठारे व्हिजनची ही नवी मालिका असून अजय पूरकर यांनी नागेश्वर घोरपडे या क्रूर आणि कपटी माणसाची भूमिका साकारली आहे. पैसा आणि संपत्तीसाठी आपल्या आई वडीलांचा जीव घेणारा आणि तेच वेळप्रसंगी आपल्या नवजात मुलीचा जीव घेणारा विश्वासघातकी व्यक्तीची भूमिकेत ते दिसणार आहेत.
मालिकेच्या या नव्या प्रोमोबाबत सांगायचं झालं तर, गोळुळाष्टमीचा कार्यक्रम सुरु असताना सगळेजण पाळणा गात असतात. तेच दुसरीकडे मालिकेची नायिका तिच्या वडिलांची दारु सुटावी यासाठी प्रयत्न करत असते. त्याचवेळी ही नायिका बारमध्ये आपल्य़ा वडिलांना शोधत असते. त्याचवेळी गुरुजी येतात आणि घोरपडेंना सांगतात की, तुमच्या नशिबाचे फासे उलटे पडणार आहेत तुमच्या मुलीच्या जन्मानंतर या संपत्तीचा जो खरा मालक आहे त्याच्य़ाकडे हे वैभव पुन्हा जाणार आहे. त्यावर नागेश्वर घोरपडे असं म्हणतात की, जिथे आई बापाला गाडलं तिथे मुलीचं काय ? यावरुनच नागेश्वर घोरपडे या माणसाच्या विकृतीचा अंदाज लागत आहे. मालिकेच्या या प्रोमो ‘कृष्ण जन्मला कंसाचा काळ’ असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्री नेहा नाईक हीची पहिलीच मालिका असून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
स्टार प्रवाहवरील मालिकेबाबत सांगायचं झालंच तर सध्या नव्या मालितकांची नांदी सुरु असल्य़ाचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री रुपाली भोसले, कृतिका देव आणि चेतन वडनेरे यांची लपंडाव मालिका देखील सप्टेेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे स्टार प्रवाहवरील नव्या मालिक य़ा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.