Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौरी इंगवलेची TV क्षेत्रात दमदार Entry! प्राजक्ता गायकवाडसह ‘या’ मालिकेत झळकणार अभिनेत्री

पाठराखीण ही नवी मालिका लवकरच स्टार प्रवाह वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन बहिणींच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि संघर्षाची भावनिक कहाणी या मालिकेतून उलगडणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 29, 2026 | 05:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

पाठराखीण ही नवी मालिका लवकरच स्टार प्रवाह वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, दोन बहिणींच्या नात्यातील निस्सीम प्रेम, त्याग आणि संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी यातून उलगडणार आहे. भाग्यश्री आणि प्राजक्ता या दोन बहिणींच्या आयुष्यातील चढ-उतार, तसेच संकटांच्या काळात एकमेकींना दिलेला आधार याची प्रभावी मांडणी या मालिकेत पाहायला मिळणार आहे. बदलत्या परिस्थितीसमोर उभ्या ठाकलेल्या या दोघींच्या नात्याची परीक्षा कशी घेतली जाते आणि त्या त्यातून कशा मार्ग काढतात, याची उत्कंठावर्धक मांडणी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ठरेल.

Raja Shivaji Movie : ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत ‘जय शिवराय’ प्रदर्शित!

या मालिकेच्या निमित्ताने प्राजक्ता गायकवाड तब्बल पाच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करत आहे. ‘प्राजक्ता कुलकर्णी’ या भूमिकेत ती एका कुटुंबाशी घट्ट बांधलेली, जबाबदार आणि भावनिक मुलगी साकारताना दिसणार आहे. लहान वयात आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर मामांच्या कुटुंबात वाढलेली ही व्यक्तिरेखा कुटुंबासाठी काहीही करण्यास तत्पर आहे. तिच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय कुटुंबाच्या हितासाठी असतो, त्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वात जिद्द आणि संवेदनशीलता यांचा सुंदर संगम दिसून येतो.

दुसरीकडे, चित्रपटसृष्टीतून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडलेली गौरी इंगवले ‘पाठराखीण’मधून मालिका विश्वात पहिल्यांदाच पाऊल ठेवत आहे. टीव्ही माध्यमातील हा तिचा पहिलाच अनुभव असून, या नव्या प्रवासाबद्दल ती अत्यंत उत्सुक आहे. घराघरात पोहोचण्याची संधी मिळणार असल्यामुळे या मालिकेबद्दल तिच्या अपेक्षा वाढल्या असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची ती आतुरतेने वाट पाहत आहे.

या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन मार्फत करण्यात आली आहे. तर मालिकेचे दिग्दर्शन राहुल लिंगायत करणार आहेत. मालिकेत आणखीही अनेक अनुभवी आणि लोकप्रिय कलाकारांची फळी झळकणार असून, त्यांच्या दमदार अभिनयामुळे कथानकाला अधिक बळ मिळणार आहे.

Naman Tula Song : महाराष्ट्र दिनी गुंजणार अभिमानाची साद! अमृता फडणवीसांच्या मधुर सुरांनी रंगलं नवं गाणं

भावनिक नात्यांची गुंफण, नाट्यमय वळणं आणि प्रभावी सादरीकरण यांच्या जोरावर ‘पाठराखीण’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कुटुंबासोबत पाहण्यासारखी ही नवी मालिका लवकरच पाहायला विसरू नका, फक्त स्टार प्रवाहवर.

Web Title: New marathi serial of gauri ingawale and prajkta gaikwad pathrakhin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • gauri ingwale
  • marathi serial update
  • star pravah

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.