(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
निकिता दत्ता ही भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीने तिच्या अभिनयाची भुरळ चाहत्यांना घातली आहे. तिचा अभिनय पाहून अनेकदा तिला कौतुकाची थाप मिळाली आहे. तसेच अभिनेत्रीने हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीत देखील धुमाकूळ घातला आहे. तिचा मराठीमधील नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘घरत गणपती’ला ऑस्कर 2024 मध्ये नामांकन मिळाले आहे. या चित्रपटात निकिताने पंजाबी तरुणी क्रिती आहुजाची भूमिका साकारली आहे, ज्याचे प्रेक्षकांकडून खूप कौतुक होत आहे. तिच्या कारकिर्दीतील ही आणखी एक महत्त्वाची कामगिरी आहे.
‘घरत गणपती’ हा चित्रपट गणेश चतुर्थीच्या सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्वाला खोलवर स्पर्श करतो, विशेषत: महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये भर देणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट कोकण संस्कृतीचा आत्मा उत्तम प्रकारे प्रतिबिंबित करतो, ज्यामध्ये निकिताने आपली भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली आहे. चित्रपटात तिने एका तरुण पंजाबी मुलीची भूमिका केली आहे जी तिच्या मराठी मित्राच्या गावी जाते. नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर दिग्दर्शित या चित्रपटात भूषण प्रधान, अजिंक्य देव, अश्विनी भावे, संजय मोने, शुभांगी लाटकर, राजसी भावे हे कलाकार मुख्यभूमीकेत आहेत.
निकिताचे मराठी चित्रपटसृष्टीतही हे यशस्वी पदार्पण आहे, ज्याने तिचा चाहतावर्ग आणखी वाढवला आहे. कौटुंबिक आणि विश्वासाच्या सार्वत्रिक थीमने प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे, ज्यामुळे चित्रपटाला आंतरराष्ट्रीय मान्यता आणि ऑस्कर 2024 च्या शॉर्टलिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये इतर 28 चित्रपट देखील आहेत. आणि या चित्रपटांसह ‘घरात गणपती’ या चित्रपटाचा देखील समावेश आहे.
हे देखील वाचा- ‘नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’मध्ये सोशल मीडियावरील दिग्गज कलाकार सहभागी होणार!
व्यावसायिक आघाडीवर, निकिता दत्ता लवकरच सिद्धार्थ आनंदच्या नेटफ्लिक्स प्रॉडक्शन ‘ज्वेल थीफ’ मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ती बॉलीवूड स्टार सैफ अली खान आणि जयदीप अहलावत यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच अभिनेत्री अनेक नव्या प्रोजेट्समध्ये दिसणार असून, हे सगळे चित्रपट ती लवकरच जाहीर करणार आहे. चाहते तिच्या नवीन चित्रपटांची आणि नव्या भूमिकांची आतुरतेने वाट पाहत आहेत.