'नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड'मध्ये सोशल मीडियावरील दिग्गज कलाकार सहभागी होणार (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
नवभारत प्रेस येत्या २६ सप्टेंबर २०२४ गुरुवार रोजी ‘नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’- सोशल अँड एक्सिलेन्स हा भव्य कार्यक्रम सोहळा साजरा करणार आहे. मुंबईमधील विक्रोळी परिसरातील ‘ताज द टीस’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात पहिल्यांदाच सोशल आणि डिजिटल मीडियावरील दिग्गज कलाकार सहभागी होणार असून, ‘नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’ कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत. ‘नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’- सोशल अँड एक्सिलेन्स या कार्क्रमाचा उत्साहात महामार्ग मंत्री नितीन गडकरी देखील सहभागी होणार आहेत. या समारंभाच्या यादीत अनेक मंत्री, कलाकार यांच्या नावाचा समावेश आहे.
याचरम्यान, ‘नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’ कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, भाजपचे मुंबई अध्यक्ष एडवोकेट आशिष शेलार आणि शिवसेनाचे खासदार श्रीकांत शिंदे या सगळ्यांची कार्यक्रमात खास हजेरी लागणार आहे. हा कार्यक्रम सोशल आणि डिजिटल मीडियावर खूप प्रभाव पडणार आहे. नवभारतची नुकतीच पहिली सुरुवात असून, हा सोहळा पुढच्या पिढीसाठी, समाजासाठी आणि लोकांसाठी नव्या क्षेत्रातील संधीचा मार्ग ठरणार आहे. लोकांचा सोशल आणि डिजिटल मीडियावरील होणारे परस्पर संवाद हा या कार्यक्रमाचा मूळ हेतू आहे. इमोटार लिमिटेड आणि अपोलो हॉस्पिटल प्रस्तुत हा सोहळा पार पडणार आहे. रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी ९१.१ FM आणि ओउटडोर पार्टनर वैलोप एडवरटायजिंग आहे.
विभिन्न क्षेत्रातील कलाकारांना दिले जाणार पुरस्कार
‘नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’ सोहळ्यात अनेक विभिन्न क्षेत्रातील कलाकारांना पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. सोशल आणि डिजिटल मीडियावरील जे इन्फ्लुएन्सर लोकांचे विचार आणि समाज सुधारण्याचा संदेश देत आहेत त्या कलाकारांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यावर्षी पुढील क्षेत्रातील इन्फ्लुएन्सर कलाकारांना हे पुरस्कार जाहीर होणार आहेत- स्टार इन्फ्लुएन्सर, लेखक, ऑटोमोटिव्ह अँड एव्हिएशन, सपोर्ट, कॉमेडी, अध्यात्म आणि जोतिष, इंफोटेंमेंट, बॉडी पॉसिटीव्हिटी, एंटरटेनमेंट, फॅशन, लाईफस्टाईल , ब्युटी, बँकिंग, शिक्षण, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल, टेक्नॉलॉजी, फोटोग्राफी, गेमिंग, आर्ट, न्युज जर्नालिस्ट, पैपाराझी म्युजिक, फूड, डान्स, हेल्थ, हिटनेस, वेलनेस यासगळ्यांसाठी या पुरस्कार सोहळ्यात नामांकन आहे.
हे देखील वाचा- सोनू सूद पुन्हा ठरला ‘मसीहा’, बेबी सेहरीश फातिमाला दिला आधार
‘नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड’ सोहळ्या बाबत आणखी माहितीसाठी वेबसाईट पहा.