Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tula Pahata : अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे ‘तुला पाहता’ चित्रपटातून कमबॅक; तीन पिढ्यांची भावस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर

Tula Pahata Marathi Film : अभिनेत्री निशिगंधा वाड ‘तुला पाहता’ या चित्रपटातून पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहेत. समकालीन कथानकावर आधारित या चित्रपटात तीन पिढ्यांची भावस्पर्शी गोष्ट मांडण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 27, 2026 | 01:12 PM
अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे ‘तुला पाहता’ चित्रपटातून कमबॅक; तीन पिढ्यांची भावस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर

अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे ‘तुला पाहता’ चित्रपटातून कमबॅक; तीन पिढ्यांची भावस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर

Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे ‘तुला पाहता’ चित्रपटातून कमबॅक
  • तीन पिढ्यांची भावस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर
  • आगामी मराठी चित्रपटात त्या प्रमुख भूमिकेत
Tula Pahata Upcoming Marathi Film Poste: मराठी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणून एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री निशिगंधा वाड या बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘तुला पाहता’ या आगामी मराठी चित्रपटात त्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी “तुला पाहता” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि  दिग्दर्शन ही  मयुरा प्रधान यांचंच आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे.चित्रपटात सतीश पुळेकर, इला भाटे, आनंद काळे, दीपाली विचारे, मानसी पाटील, नचिकेत लेले, पल्लवी अजय, स्वप्नील परजणे आणि आकाश शिंदे अशी उत्तम आणि अनुभवी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

गोविंदाची पत्नी सुनीता पुन्हा चर्चेत! म्हणते “Govinda सारखा मुलगा हवा पती नको” काय आहे प्रकरण?

भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला विशेष महत्त्व आहे. मात्र, अशा कुटुंब व्यवस्थेत जेव्हा तरुण जोडपं स्वतःची ओळख, नातेसंबंध, स्वातंत्र्य आणि समजूतदारपणा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा अनेक भावनिक, सामाजिक आणि वैचारिक स्तरांवर संघर्ष उभे राहतात. ‘तुला पाहता’ ही याच पार्श्वभूमीवर आधारित एक रंजक, संवेदनशील आणि समकालीन कथा आहे. या कथेत तीन पिढ्या एकत्र दिसतात आणि त्यांच्या नात्यांमधील गाठी न ताणता, त्या कशा अलगद सोडवल्या जाऊ शकतात, याचा सुंदर प्रवास या चित्रपटातून उलगडतो.

चित्रपटाविषयी बोलताना अभिनेत्री निशिगंधा वाड म्हणाल्या, “हा चित्रपट अत्यंत समकालीन आणि काळाला अनुरूप आहे. पिढ्यांमधली वीण कुठेही गाठ न बसता, सगळ्या गाठी कशा सोडवल्या जातात, ही या कथेची फार सुंदर बाजू आहे. या चित्रपटात तीन पिढ्यांची गोष्ट आहे आणि ती गोष्ट मला खूप आवडली. मयुरा हिचा मी या चित्रपटात असावं हा आग्रह होता आणि तो मला मोडता आला नाही. इतक्या वर्षांनंतर पुन्हा मराठी चित्रपट करताना एखादी भूमिका पूर्णपणे माझी असावी असा आग्रह असू शकला असता, पण मयुराने ज्या पद्धतीने कथा सांगितली आणि भूमिका समजावली, त्यामुळे मी लगेच या चित्रपटाचा भाग होण्याचा निर्णय घेतला. एका चांगल्या चित्रपटाचा भाग झाल्याचा मला खूप आनंद आहे.”

चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता ‘तुला पाहता’ या चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली आहे. एक वेगळा विषय, समृद्ध अभिनय आणि भावनिक कथानक यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात नक्कीच विशेष स्थान निर्माण करेल.

धीरेंद्र शास्त्रीच्या मुद्द्यावर तापला Riteish Deshmukh! शेअर केली पोस्ट; म्हणाला “असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न…”

Web Title: Nishigandha wad comeback tula pahata marathi movie marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • marathi movie

संबंधित बातम्या

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
1

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
2

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं
3

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?
4

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.