Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

”पोटात गोळा अन् छातीत धडधड, तरी…”, ‘ही’ मराठी अभिनेत्री 7 वर्षांनी ‘या’ मालिकेतून करणार कमबॅक

स्टार प्रवाह वाहिनीवर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतून ही अभिनेत्री पुन्हा एकदा टीव्हीवर कमबॅक करणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 12, 2025 | 08:10 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

नस्टार प्रवाह वाहिनीने नवीन वर्षात काही नव्या मालिकांची घोषणा केली असून, त्यातील एक आगामी मालिका म्हणजे ‘वचन दिले तू मला’. ही मालिका १५ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्री श्वेता पेंडसे सात वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. श्वेताने आपल्या सोशल मीडियावर मालिकेतील पूर्वा शिंदे या भूमिकेतील एक फोटो शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

श्वेताने फोटोसोबत लिहिले आहे की, ती पुन्हा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना मनोरंजन देण्यासाठी सज्ज आहे आणि ही भूमिका तिच्यासाठी खूप खास आहे. या मालिकेतून प्रेक्षकांना मनोरंजक कथा आणि श्वेताच्या अभिनयाचा परतावा पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या भूमिकेतील एक फोटो तिने शेअर करून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या पोस्टमध्ये श्वेता म्हणाली, ”पोटात 10 किलोचा गोळा…छातीत धडधड.. आणि तरीही प्रचंड आनंद आणि विलक्षण उत्साह जाणवतोय. 7 वर्षांनी पुन्हा एकदा मालिकेत अभिनय करतेय. म्हणतात ना.. Best things happen when they are least expected.. अगदी तसंच झालं. बरेच दिवसांपासून एका वेगळ्या आणि चांगल्या भूमिकेच्या शोधात होते आणि मनीमानशी नसताना अक्षरशः एका दिवसात हे सगळं जुळून आलं. पहिल्या दिवशी सेटवर गेले तेव्हा माझाच विश्वास बसत नव्हता की मी पुन्हा एकदा शूट करतेय. माझा अभिनेत्री म्हणून मालिका विश्वातला प्रवास स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘ लक्ष्य ‘ मालिकेपासून सुरू झाला. त्यानंतर याच वाहिनीवर ‘ जयोस्तुते ‘ ही मालिका केली. नंतर सेवंथ सेन्स मीडिया बरोबर केलेली ‘ अस्स सासर सुरेख बाई ‘ ही मालिका खूप गाजली. यातल्या ‘ विभावरी इनामदार’ या भूमिकेने मला मालिकाविश्वात खऱ्या अर्थाने अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. ”

पुढे अभिनेत्री म्हणते, ”आता हा नवीन प्रवास पुन्हा एकदा स्टार प्रवाह आणि सेवंथ सेन्स मीडिया बरोबरच सुरू होतो आहे हा विलक्षण योगायोग! ‘ वचन दिले तू मला ‘ या मालिकेत ‘ पूर्वा शिंदे’ ही भूमिका करायची संधी मिळाली आहे. ही अत्यंत गोड व्यक्तिरेखा आहे. मला ऐकताक्षणी ही भूमिका फार भावली कारण या व्यक्तिरेखेला खूप कंगोरे आहेत. माझ्यासाठी ही भूमिका साकारणं खरं तर एक आव्हान आहे..ते का, हे मालिका बघितल्यावर तुम्हाला कळेलच! ”

यानंतर श्वेता म्हणते, ” रंगभूमीवर ‘ 38 कृष्ण व्हीला’ नाटकातील ‘ नंदिनी’.. ‘ शश sss घाबरायचं नाही’ मधली ‘ निरांजनी ‘ आणि ‘ खानावळवाली’, ‘ अ परफेक्ट मर्डर’ मधील इन्स्पेक्टर घारगे आणि आता ‘ वचन दिले तू मला ‘ मालिकेमध्ये ‘ पूर्वा शिंदे ‘ या अत्यंत भिन्न चार व्यक्तिरेखा एकाच वेळेला मला साकारायला मिळतायेत ही एक अभिनेत्री म्हणून किती कित्ती सुखावणारी गोष्ट आहे.

Akshaye Khannaचं लग्न का मोडलं? अभिनेत्रीच्या आईमुळे बदललं आयुष्य, अभिनेता अजूनही अविवाहित


”माझं जीवन इतकंच”, Salman Khanने केला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा , म्हणाला, ”गेल्या 25 वर्षात मी…”

‘ मी आता मालिकेत कामच करणार नाहीये’ असं सगळ्यांना वाटत असताना या सुंदर व्यक्तिरेखेची जबाबदारी माझ्यावर विश्वासाने आणि हक्काने टाकल्याबद्दल सेवंथ सेन्स मीडिया आणि संपूर्ण स्टार प्रवाह टीमचे मी मनापासून आभार मानते. खूप भीती वाटतेय खरंतर…पण मी जीव ओतून काम करेन. तुम्हालाही पूर्व शिंदे, या मालिकेतल्या इतर सगळ्याच व्यक्तिरेखा आणि ही मालिकासुद्धा खूप आवडेल याची आशा नव्हे खात्री आहे. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी असू द्या ”

Web Title: Popular actress shweta pendse is making a comeback on the small screen after seven years with the show vachan dile tu mala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 08:10 PM

Topics:  

  • marathi actress
  • New Marathi Serial
  • star pravah serial

संबंधित बातम्या

स्टार प्रवाहची नवीन मालिका ‘तुझ्या सोबतीने’, खलनायिका शालिनीचा दमदार कमबॅक, नवी अभिनेत्री कोण?; प्रोमो पाहा
1

स्टार प्रवाहची नवीन मालिका ‘तुझ्या सोबतीने’, खलनायिका शालिनीचा दमदार कमबॅक, नवी अभिनेत्री कोण?; प्रोमो पाहा

वल्लरी पिंगा गर्ल्सच्या मदतीने घेणार मिनाक्षीचा शोध! पाहा ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेचा विशेष भाग
2

वल्लरी पिंगा गर्ल्सच्या मदतीने घेणार मिनाक्षीचा शोध! पाहा ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेचा विशेष भाग

Star Pravah Serial: सर्वात मोठा खुलासा…,जीवा-काव्याचं रोमॅंटिक फोटो आले समोर; देशमुखांना बसणार जबरदस्त धक्का; पाहा प्रोमो
3

Star Pravah Serial: सर्वात मोठा खुलासा…,जीवा-काव्याचं रोमॅंटिक फोटो आले समोर; देशमुखांना बसणार जबरदस्त धक्का; पाहा प्रोमो

मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सीजन ४: ‘या’ मराठी अभिनेत्रीची लेक करणार सूत्रसंचालन
4

मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सीजन ४: ‘या’ मराठी अभिनेत्रीची लेक करणार सूत्रसंचालन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.