Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रिया बापटने ‘रात जवां है’मधील स्वतःच्या लक्षवेधी भूमिकेचे श्रेय दिग्‍दर्शक अन् लेखकांना दिले!

मराठी अभिनेत्री प्रिया बापट नेहमीच तिच्या चित्रपटांसाठी आणि भूमिकेसाठी चर्चेत असते. याचदरम्यान अभिनेत्रीचा नवा प्रोजेक्ट ‘रात जवां है' हा लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तसेच अभिनेत्रीने ‘रात जवां है' या सिरीजमध्ये साकारलेल्या भूमिकेचे श्रेय तिचे या चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शकांना दिले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 04, 2024 | 08:54 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

सोनी लिव्‍हने नुकतेच सिरीज ‘रात जवां है’चा ट्रेलर लाँच केला आणि प्रेक्षकांकडून सुरूवातीला मिळालेला प्रतिसाद अत्‍यंत उत्‍स्‍फूर्त आहे. तसेच सिरीजमधील कलाकारांचे प्रिया बापट, बरूण सोबती आणि अंजली आनंद त्‍यांच्‍या परफॉर्मन्‍ससाठी कौतुक करण्‍यात आले आहे. या सिरीजमध्‍ये सुमनची भूमिका साकारणारी प्रिया बापट हा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद आणि तिला सतत मिळत असलेले कौतुक पाहून भारावून गेली आहे.

सिरीजच्‍या या ट्रेलरमधून तिची परिवर्तनात्‍मक भूमिका दिसून आली आहे, तसेच प्रेक्षकांना या सिरीजच्‍या उत्तम कथानकाची लक्षवेधक झलक देखील पाहायला मिळाली आहे. सिरीजचे कथानक तीन जिवलग मित्र – राधिका (अंजली आनंद), अविनाश (बरूण सोबती) आणि सुमन (प्रिया बापट) यांच्‍या अनपेक्षित जीवनाला सादर करते, जेथे ते सर्वात रोमांचक प्रवासाची सुरूवात करतात, ते म्‍हणजे तान्‍ह्या मुलांचे संगोपन. यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. जी प्रेक्षकांना नव्या अनुभवात पाहायला मिळणार आहे.

सुमनची भूमिका साकारण्‍याच्‍या अनुभवाबाबत सांगताना अभिनेत्री प्रिया बापट म्हणाली की, “कथानकाने प्रबळ पाया रचला असला तरी सुमीत व्‍यास (दिग्‍दर्शक) आणि ख्‍याती आनंद-पुथरन (लेखक व निर्माते) यांचे माहितीपूर्ण मार्गदर्शन मोलाचे ठरले, ज्‍यामुळे माझी भूमिका सुमनला आकार मिळाला. त्‍यांचे दिग्‍दर्शन आणि लेखनामुळे मला सुमनच्‍या भूमिकेमधील भावनिकतेबाबतच्या बारकाव्‍यांचा शोध घेण्‍यास आणि आत्‍मसात करण्‍यास मदत झाली. त्‍यांच्‍या पाठिंब्‍यामुळे मी या भूमिकेच्‍या आत्‍मनिरीक्षणशील आणि संघर्षाची सवय नसलेल्या स्‍वभावाला वास्‍तविकपणे सादर करू शकले.” असे तिने सांगितले आणि त्यांना या सगळ्याचे श्रेय दिले.

हे देखील वाचा- नचिकेत पूर्णपात्रे झळकला “विस्फोट” चित्रपटात, रितेश-फरदीनसह अभिनेत्याचे नाव चर्चेत!

यामिनी पिक्‍चर्स प्रा. लि. द्वारे निर्मित सिरीज ‘रात जवां है’चे लेखन आणि निर्मिती ख्‍याती आनंद – पुथरन यांनी केले आहे. आणि अत्‍यंत प्रतिभावान सुमीत व्‍यास यांनी दिग्‍दर्शन केले आहे. तसेच या सिरीजचे निर्माते विकी विजय आहेत. या कॉमेडी-ड्रामामध्‍ये प्रतिभावान स्‍टार कलाकार आहेत. ‘रात जवां है’ पाहण्यास पर्वणी अशी सिरीज आहे, ज्‍यामध्‍ये हसवून-हसवून लोटपोट करणारे क्षण, हृदयस्‍पर्शी सीनचा समावेश करण्यात आला आहे. याचदरम्यान, ‘रात जवां है’सह पालकत्‍वाचा रोमांचक प्रवास पाहण्‍यासाठी सज्‍ज राहा आणि सिरीज ११ ऑक्‍टोबरपासून सोनी लिव्‍हवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Priya bapat gave credits the director and writers for her tremendous role in raat jawan hai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 12:36 PM

Topics:  

  • entertainment
  • Sony Liv

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
4

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.