मराठी मालिका, नाटक आणि सिनेमा विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे. गेली दोन वर्ष प्रिया कर्करोगाच्या आजाराशी झुंज देत होती. मात्र तिची ही लढाई अपयशी ठरली. मोहक हास्याची, करारी अभिनय अशी ओळख प्रिया मराठेची आजही आहे. मुख्य नायिका साकारण्यापेक्षा ही प्रियाने साकारलेल्या खलनायिकांच्या भुमिकांना प्रेक्षकांनी कायमच पसंती दिली आहे. मराठी सिनेविश्वात स्वत:चं स्थान मिळवणाऱ्या या अभिनेत्रीच्या कारकिर्दीची सुरुवात झाली तेच झी मराठी वाहिनीवरील ‘या सुखांनो या’ या मालिकेपासून.
या सुखांनो या ही मालिका प्रियाच्या करियरचा जसा महत्वाचा टप्पा ठरली तशीच ती निमित्त ठरेली ते शंतनू प्रियाच्या मैत्रीची आणि प्रेमाची. या मालिकेतील प्रियाची सहकलाकर शर्वरी लोहोकरे हीच्यामुळे प्रिया आणि शंतनूची ओळख झाली. प्रिया मुळची ठाण्याची मात्र मालिकेच्या शुटींगसाठी म्हणून ती शर्वरी लोहोकरे हिच्याबरोबर अंधेरी रहायला होती. मालिकेच्या शुटींगच्या निमित्ताने प्रिया आणि शंतनू यांच्यातील मैत्री वाढत गेली आणि या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. फक्त एकमेकांवर प्रेम असून चालत नाही तर एकमेकांच्या विचारांचा आदर आणि करियरला प्रोत्साहन देणं देखील तितकंच महत्वाचं असतं. प्रिया शंतनू यांनी एकमेकांच्या प्रेमाचा स्विकार केला त्या दिवसापासून ते आजपर्यंत दोघांनीही एकमेकांना स्ट्रगलच्या काळात सांभाळून घेतलं.
शंतनू हा जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा. त्यामुळे अभिनय क्षेत्रात करियरसाठी करावा लागणारा संघर्ष शंतनूला काही नवीन नव्हता. या सुखांनो या मालिकेच्या एका पार्टीदरम्यान श्रीकांतने प्रियाला फिल्म सिटीमध्ये त्याच्या प्रेमाची कबूली दिलाी. त्यावेळी कोणताही वेळ न घेता प्रियाने देखील शंतनूला होकार दिला. त्य़ानंतर दीड ते दोन वर्ष दोघांनीही आपलं नातं गुपित ठेवलं. मात्र एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान मंचावर शंतनूने प्रियाचं नाव घेतलं आणि यांच्या प्रेमाबाबत सगळ्यांना कळलं.
दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर 2012 मध्ये प्रिया आणि शंतनू हे लग्नाच्या बेडीच अडकले. शंतनू प्रिया सिनेविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. करियरप्रमाणेच वैयक्तिक आयुष्याबाबत देखील कायमच चर्चेत राहिले आहेत. अभिनयाव्यतिरिक्त प्रिया आणि शंतनूने स्वत;कॅफे देखील सुरु केलं. एकमेकांना सांभाळून घेत संसार करणाऱ्या या जोडीला मात्र कोणाची नजर लागावी तसं झालं. दोन वर्षापूर्वी प्रियाला कर्करोग झाल्याचं निदान झालं आणि अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली.