Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षा उसगांवकर यांना मोठा धक्का; अभिनेत्रीची लाखोंची फसवणूक, बिल्डर-दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल

ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची लाखोंची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अभिनेत्रीला यामुळे मोठा धक्का बसला आहे, आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 05, 2026 | 09:51 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वर्षा उसगांवकर यांना मोठा धक्का
  • अभिनेत्रीची लाखोंची फसवणूक
  • बिल्डर-दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल
 

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना मोठा आर्थिक धक्का बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिनेत्री मृणालिनी जांभळे यांच्यासह काही अभिनेत्रींची तब्बल 47 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून शिवाजी पार्क पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात दिग्दर्शक तसेच बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

स्टार प्लसने ‘अ‍ॅडव्होकेट अंजली अवस्थी’ चा नवा टीझर आणला प्रेक्षकांच्या भेटीला!

नेमकं काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची तक्रार अभिनेत्री मृणालिनी सुभाष जांभळे यांनी केली आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपटांत काम केलेल्या मृणालिनी यांची आरोपी अविनाश जाधव यांच्याशी व्यावसायिक ओळख होती. जाधव यांनी स्वतःला चित्रपट निर्माता आणि बिल्डर असल्याचे सांगत डोंबिवली येथील बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल आणि वर्षभरात मूळ रक्कम परत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या आश्वासनांवर विश्वास ठेवून नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत मृणालिनी जांभळे, वर्षा उसगांवकर आणि त्यांच्या ओळखीतील आणखी तीन जणांनी चेक आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे एकूण 47 लाख रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला जाधव यांनी परतावा म्हणून सुमारे साडेचार लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर त्यांनी पैसे परत देणे बंद केले.

लग्नाच्या रिसेप्शनला पारंपारिक लूकमध्ये चमकली रश्मिका; विजयचीही स्टाईल लक्षवेधी, पाहा Video

“जे करायचे ते करा”, आरोपीची धमकी

तक्रारदारांनी वारंवार संपर्क साधून पैसे मागण्याचा प्रयत्न केला, पण जाधव यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. उलट त्यांनी आपला मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलत संपर्क टाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर तक्रारदारांनी डोंबिवली येथे जाऊन जाधव यांची भेट घेतली आणि पैशांबाबत जाब विचारला. मात्र “मी पैसे देणार नाही, जे करायचे ते करा,” असे उलट उत्तर देत त्यांनी धमकी दिल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व तक्रारदारांनी 26 फेब्रुवारी रोजी दादर येथील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश शेजुळ यांच्याकडे सोपवण्यात आला असून पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

Web Title: Marathi actress varsha usgaonkar and others lose lakhs of rupees in builder fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi actress
  • Marathi News

संबंधित बातम्या

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
1

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
2

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
3

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले
4

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.