'धुरधंर' Ranveer Singh ला कोट्यवधी रुपयांची मागणी करणारा धमकीचा मेसेज, पोलिसांकडून सुरक्षा वाढवली
बॉलिवूड क्षेत्रातून मोठी बातमी समोर येत आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर, आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगलाही धमकी मिळाली आहेत. मंगळवारी (10 फेब्रुवारी) व्हॉट्सअॅपवरून रणवीर सिंगला एक व्हॉइस नोट पाठवण्यात आली असून त्यात कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. रणवीर सिंगचा चित्रपट “धुरंधर” हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनल्यापासून तो चर्चेत आहे.
रणवीर सिंगला मिळालेल्या धमकीनंतर मुंबई पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आलीय त्यानंतर गुन्हे शाखेने तपास सुरू केला. पोलिसांकडून धमकी देणारी व्हॉइस नोट पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि स्थान शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. रणवीर सिंग किंवा त्याच्या टीमने कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नसली तरी, पोलीस हे प्रकरण गांभीर्याने घेत आहेत आणि प्रत्येक कोनातून तपास करत आहेत. दरम्यान, अभिनेत्याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आल्याचे वृत्तही समोर येत आहे.
आयएएनएसने या घटनेबाबत वृत्त दिले आहे की, “चित्रपट निर्माते रोहित शेट्टीच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला व्हॉट्सअॅपवर कोट्यवधी रुपयांची मागणी करणारा धमकीचा संदेश मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी अभिनेत्याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे आणि धमकी देणाऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.”
यापूर्वी, ३१ जानेवारी रोजी रात्री उशिरा, प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर पाच गोळीबार झाला होता. त्यावेळी रोहित शेट्टी घरी उपस्थित होता. मात्र गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणासंदर्भात पुण्यातून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रणवीर सिंगला व्हॉट्सअॅप व्हॉइस नोटद्वारे धमकीचा संदेश पाठवण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या संदेशात कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या धमकीनंतर मुंबई पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी धमकीचा संदेश पाठवणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाची चौकशी करत आहे. तथापि, रणवीर सिंगच्या टीमने किंवा त्याच्याकडून अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही.
रणवीर सिंग सध्या त्याच्या कामामुळे आणि व्यावसायिक बांधिलकीमुळे सतत चर्चेत आहे. अभिनेता शेवटचा ब्लॉकबस्टर “धुरंधर” मध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याने हमजाच्या भूमिकेने बरीच प्रसिद्धी मिळवली होती. चित्रपटात रणवीरने एका भारतीय गुप्तहेराची भूमिका केली होती. आदित्य धर दिग्दर्शित हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून रेकॉर्डब्रेक बॉक्स ऑफिस कलेक्शन करत आहे आणि आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पोहोचला आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर, “धुरंधर” चा दुसरा भाग आता प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. हा चित्रपट १९ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, रणवीर सिंग “डॉन ३” मधून बाहेर पडल्याच्या कथित कारणामुळे वादात अडकला आहे. अलिकडच्या वृत्तांनुसार, रणवीरच्या अचानक निघून जाण्यामुळे चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया थांबली आहे आणि हा प्रकल्प थांबलेला दिसतो. हृतिक रोशन त्याची जागा घेईल अशाही अफवा आहेत. असा दावा केला जात आहे की यामुळे स्टुडिओचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अहवालांनुसार एक्सेल एंटरटेनमेंटने या नुकसानाची भरपाई करण्यासाठी रणवीर सिंगकडून अंदाजे ₹४० कोटींची भरपाई मागितली आहे. रणवीरने प्रोडक्शन हाऊसला कोणत्याही देयकासाठी तो जबाबदार नसल्याचे म्हटले आहे आणि त्याच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे.






