Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलवणार! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझरची झलक दिसणार ‘बिग बॉस’ च्या भाऊच्या धक्क्यावर

‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर आज 'बिग बॉस मराठी' मध्ये रितेश देशमुख यांच्या हस्ते पहिल्यांदाच टीव्हीवर प्रदर्शित होणार असून, हा खास क्षण प्रेक्षकांना टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 05, 2026 | 11:15 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलवणार
  • ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर चर्चेत
  • ‘बिग बॉस’ च्या भाऊच्या धक्क्यावर चित्रपटाची झलक
 

मराठी प्रेक्षकांसाठी आजचा दिवस खरोखरच खास ठरणार आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित भव्य चित्रपट राजा शिवाजीचा फर्स्ट लूक टीझर आज पहिल्यांदाच राष्ट्रीय टेलिव्हिजनवर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा ऐतिहासिक क्षण प्रेक्षकांना लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ मधून अनुभवता येणार आहे.

‘रामायण’ मध्ये बिग बींच्या जावयाची एन्ट्री; ‘रावण’ यशसोबत होणार महायुद्ध, नक्की कोण आहे हा अभिनेता?

या शोचे होस्ट रितेश देशमुख स्वतः आपल्या ‘भाऊचा धक्का’ या खास सेगमेंटमध्ये हा टीझर सादर करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज, ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार वर हा ऐतिहासिक क्षण पाहता येणार आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट केवळ एक सिनेमॅटिक प्रोजेक्ट नसून मराठी माणसाच्या अभिमानाचा आणि इतिहासाचा गौरव करणारा एक भव्य सोहळा ठरणार आहे. “आपला राजा, आपला अभिमान” या घोषवाक्याखाली साकारलेला हा चित्रपट प्रेक्षकांना शिवरायांच्या पराक्रमाची नव्या पद्धतीने अनुभूती देणार आहे.

या चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर टीव्हीवर प्रदर्शित करण्यामागे निर्मात्यांचा उद्देश स्पष्ट आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत शिवरायांचा गौरव पोहोचवणे. ‘बिग बॉस मराठी’सारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवरून हा टीझर लाँच केल्यामुळे तो घराघरात पोहोचणार आहे. इतिहास, भावना आणि भव्यता यांचा संगम असलेला ‘राजा शिवाजी’ चित्रपट १ मे २०२६ पासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठीसोबतच हिंदी आणि तेलुगू भाषांमध्येही रिलीज होणार आहे, ज्यामुळे शिवरायांची गाथा देशभरात आणि जागतिक स्तरावर पोहोचणार आहे.

नमित मल्होत्रांच्या ‘रामायण’ची जगभरात धूम; 14 शहरांत घुमला ‘राम’चा जयघोष, Viral Video चर्चेत

एकंदरीत, ‘राजा शिवाजी’चा हा फर्स्ट लूक टीझर केवळ एक झलक नसून मराठी अस्मितेचा अभिमान जागवणारा क्षण आहे. आज रात्री ८ वाजता हा भव्य सोहळा पाहायला प्रेक्षकांना मिळणार आहे. कारण हा फक्त टीझर नाही, तर इतिहासाला दिलेला एक मानाचा मुजरा आहे.

Web Title: Raja shivaji first look teaser bigg boss marathi 6 riteish deshmukh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

KGF Star Yash : ‘आई-वडिलांसोबत पाहू शकत नाही असा रोमँटिक सीन…’, ‘टॉक्सिक’ वादात KGF स्टार यशचा जुना व्हिडिओ व्हायरल
1

KGF Star Yash : ‘आई-वडिलांसोबत पाहू शकत नाही असा रोमँटिक सीन…’, ‘टॉक्सिक’ वादात KGF स्टार यशचा जुना व्हिडिओ व्हायरल

‘मातृभूमी’ चित्रपटाच्या सेन्सॉर वादाच्या बातम्या खोट्या! सलमान खान फिल्म्सचे मोठं स्पष्टीकरण
2

‘मातृभूमी’ चित्रपटाच्या सेन्सॉर वादाच्या बातम्या खोट्या! सलमान खान फिल्म्सचे मोठं स्पष्टीकरण

OTT प्रेमींसाठी मेजवानी! ‘या’ आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा डबल धमाका; ‘कॉकटेल 2’सह ६ चित्रपट पाहण्यासाठी सज्ज
3

OTT प्रेमींसाठी मेजवानी! ‘या’ आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा डबल धमाका; ‘कॉकटेल 2’सह ६ चित्रपट पाहण्यासाठी सज्ज

Aamir Khan आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची उत्सुकता शिगेला! ‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी; शाही मेजवानीचा मेन्यू चर्चेत
4

Aamir Khan आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची उत्सुकता शिगेला! ‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी; शाही मेजवानीचा मेन्यू चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.