(फोटो सौजन्य - x अकाउंट)
भारतीय चित्रपटसृष्टीतील अध्यात्मिक कथनाला एक नवे रूप देणारा चित्रपट म्हणजे ‘संत तुकाराम’ हा चित्रपट आहे. कर्जन फिल्म्स आणि पुरुषोत्तम स्टुडिओज यांच्या सहनिर्मितीत, आदित्य ओम यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १७ व्या शतकातील महान मराठी संत कवी संत तुकाराम यांच्या जीवनावर, विचारसरणीवर आणि त्यांच्या भक्ति चळवळीवर आधारित आहे. हा चित्रपट आता लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांसाठी दाखल होणार आहे.
‘कौन बनेगा करोडपती’शो ला २५ वर्षे पूर्ण, अमिताभ बच्चन यांनी शेअर केली खास पोस्ट…
चित्रपटाचे पोस्टर्स आणि प्रभावी टीझर लाँच केल्यानंतर, आता चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात पुण्यातून झाली आहे. मुख्य कलाकार सुबोध भावे, शिवा सूर्यवंशी आणि शिना चोहन यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि चित्रपटाबद्दल संवाद साधला. चित्रपट ‘संत तुकाराम’ हा १७ व्या शतकातील संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांनी भक्तीला सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनवले. पुण्याच्या भेटीआधी अभिनेत्री शिना चोहन यांनी देहू येथील संत तुकाराम मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले. या चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात आता पुण्यापासून सुरु केली आहे.
दिग्दर्शक आदित्य ओम यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचा टीझर अतिशय प्रभावी असून, तो तुकाराम महाराजांच्या अध्यात्मिक आणि सामाजिक प्रवासाची झलक दाखवतो. तुकाराम महाराजांचा प्रवास एक दुःखाने ग्रस्त पती ते समाजासाठी आवाज बनलेला संत हे या चित्रपटात उलगडले जाणार आहे. या चित्रपटात संजय मिश्रा, अरुण गोविल, शिशिर शर्मा, हेमंत पांडे, गणेश यादव, मुकेश भट्ट, गौरी शंकर, ट्विंकल कपूर, रुपाली जाधव, DJ अकबर सामी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘तू धडकन मैं दिल’ मालिकेच्या संगीत मैफिलीत सामील होणार आदित्य नारायण, पाहा विशेष भाग
चित्रपटाचे संगीत निखिल कामत, रवि त्रिपाठी आणि वीरल-लावण यांनी दिले आहे. अभंग परंपरेसोबत शास्त्रीय आणि लोकसंगीताचा सुंदर संगम यामध्ये ऐकायला मिळणार आहे. प्रत्येक गीत तुकारामांच्या भक्ती, दुःख आणि संघर्षाला प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहे. बी. गौतम यांच्या कर्जन फिल्म्स आणि पुरुषोत्तम स्टुडिओज् निर्मित ही भव्य कलाकृती भारतातील सर्व भाषांतील, प्रांतातील आणि धर्मातील प्रेक्षकांना भावेल अशी आशा आहे. तसेच चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.