Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“शेकडो दारं, अनेक सदस्य… आणि एकच बॉस!” बिग बॉस मराठीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस!

अखेर आता मराठी 'बिग बॉस' प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोचे एकूण पाच सीझन हिट झाल्यानंतर आता सहावा सीझन प्रेक्षकांचे किती मनोरंजन करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 06, 2026 | 12:32 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • शेकडो दारं, अनेक सदस्य… आणि एकच बॉस
  • बिग बॉस मराठीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस
  • काय आहे बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची थीम?
 

मराठी मनोरंजनाची ओळख बनलेला, ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र डोळे लावून पाहतो असा मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात भव्य आणि चर्चेत असलेला रिॲलिटी शो ‘BIGG BOSS मराठी’ पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. देशाचा लाडका सुपरस्टार, आपले लाडके ‘भाऊ’ रितेश देशमुख बिग बॉस मराठीचा नवा सीझन घेऊन येत आहेत.

‘Stranger Things 5’ या डॉक्यूमेंट्रीचा भावुक करणारा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या रिलीज डेट

“बिग बॉस सांगू इच्छितात, बिग बॉस आदेश देत आहेत…” हा दमदार आवाज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरांत घुमणार आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’चं घर नव्या रूपात, नव्या रचनेत आणि नव्या खेळाच्या नियमांसह सादर होत असून, “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” या रोमांचक थीमसह नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी ते पूर्णपणे तयार आहे. १०० हून अधिक कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत, तब्बल १०० दिवस चालणाऱ्या या प्रवासात अतरंगी स्वभावांचे बहुरंग, नात्यांचे बदलते पदर, प्रेम-मैत्री, मतभेद, भांडणं आणि चुरशीचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

बिग बॉसच्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यातील दुवा म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक. मागील पर्वात आपल्या ठाम मतांमुळे, रोखठोक भूमिका, पण तितक्याच प्रेमळ स्वभावाने, साध्या-सहज व्यक्तिमत्त्वाने आणि गरज पडल्यास कडक शिस्तीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारे, हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय सुपरस्टार रितेश देशमुख याही पर्वात सूत्रसंचालकाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. मागील सीझनमध्ये त्यांनी कधी मित्र, कधी मार्गदर्शक बनून सदस्यांना आरसा दाखवला, परखड मत व्यक्त केली आणि खोटेपणाचे मुखवटे उतरवले. हे सगळं यंदाही पाहायला मिळणार आहे.

प्रीमिअच्या आधीच समोर आली ‘बिग बॉस मराठी 6’ च्या स्पर्धकांची नावं, गौतमी पाटील नवे तर ‘ही’ अभिनेत्री करणार एन्ट्री

अस्सल महाराष्ट्रीयन स्वॅगसह रितेश देशमुख यंदा हा खेळ अधिक रंगतदार करणार असून, घरातील सदस्यांसह प्रेक्षकांवरही आपल्या सूत्रसंचालनाची छाप ते नक्कीच सोडतील. JioHotstar नेटवर्कसाठी बनिजे आशियाने निर्मित केलेला ‘बिग बॉस मराठी’चा सीझन ६ एका दिमाखदार सोहळ्याद्वारे ११ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता, आपल्या लाडक्या कलर्स मराठी आणि JioHotstar वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतरचे भाग दररोज रात्री ८ वाजता प्रसारित होतील. बनिजे आशियाने निर्मित केलेला ‘बिग बॉस मराठी’चा सीझन ६ एका दिमाखदार सोहळ्याद्वारे ११ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता, आपल्या लाडक्या कलर्स मराठी आणि JioHotstar वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतरचे भाग दररोज रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे.

बिग बॉस सुरू होण्याआधीच संपूर्ण महाराष्ट्रात या सीझनमधील स्पर्धकांबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. प्रत्येक मराठी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असताना, यंदाही आपल्या खास स्टाईल आणि दिलखुलास अंदाजाने रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचे सूत्रसंचालन करणार आहे, याबाबत बोलताना रितेश देशमुख म्हणाला, ‘बिग बॉस मराठी’चं घर म्हणजे रोज नवं वळण आणि नवं आव्हान. पुन्हा एकदा या शोचं सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. यंदा कुठलं दार कुणाचं नशीब उघडेल, हे कुणालाच माहीत नाही. या शोची खरी मजा म्हणजे सदस्यांमधले लपलेले पैलू प्रेक्षकांसमोर आणणे. यंदाच्या सीझनमध्ये राडा, धुरळा, भावना आणि मस्ती सगळं काही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सहाव्या सीझनसाठी सज्ज राहा, कारण यंदा ‘बिग बॉस मराठी’ अधिक बेधडक, अनपेक्षित आणि अगदी अस्सल मराठमोळा असणार आहे.”

मराठी माणूस म्हटलं की गप्पा, चर्चा ही रंगणारच आहे. वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं एकत्र आली की भांडणं, रुसवे-फुगवे, मैत्री, प्रेम आणि स्पर्धा अपरिहार्य ठरते. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदाही विविध क्षेत्रातील अतरंगी स्पर्धक एका छताखाली राहणार आहेत. यंदाच्या सीझनची सर्वात मोठी खासियत म्हणजे घराची आगळीवेगळी संकल्पना. यावर्षी १३,००० चौरस फूट भव्य जागेत विविध क्षेत्रातील १६ हून अधिक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व सदस्य म्हणून घरात जाणार आहेत. अनेक दारांनी सजलेलं हे भव्य घर केवळ राहण्यासाठी नसून, तेच या खेळाचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे. प्रत्येक दारामागे एखादं आव्हान, एखादा धक्का किंवा एखाद्याचं नशीब बदलणारा क्षण दडलेला असेल. “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” ही केवळ टॅगलाईन नसून यंदाच्या सीझनचं मुख्य वैशिष्ट्य आहे.

Web Title: Riteish deshmukh reveals how he plans to run bigg boss marathi 6

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 12:32 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • entertainment
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

प्रीमिअच्या आधीच समोर आली ‘बिग बॉस मराठी 6’ च्या स्पर्धकांची नावं, गौतमी पाटील नवे तर ‘ही’ अभिनेत्री करणार एन्ट्री
1

प्रीमिअच्या आधीच समोर आली ‘बिग बॉस मराठी 6’ च्या स्पर्धकांची नावं, गौतमी पाटील नवे तर ‘ही’ अभिनेत्री करणार एन्ट्री

‘Stranger Things 5’ या डॉक्यूमेंट्रीचा भावुक करणारा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या रिलीज डेट
2

‘Stranger Things 5’ या डॉक्यूमेंट्रीचा भावुक करणारा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या रिलीज डेट

‘रणवीर सिंग आणि आयुष्मानने केला कास्टिंग काउचचा सामना’, समलैंगिक निर्माते आणि शाहरुख खानबद्दलही मोठा दावा
3

‘रणवीर सिंग आणि आयुष्मानने केला कास्टिंग काउचचा सामना’, समलैंगिक निर्माते आणि शाहरुख खानबद्दलही मोठा दावा

पत्नीसह तुरुंगात असलेल्या विक्रम भट्ट यांना उच्च न्यायालयाकडून मोठा झटका, FIR रद्द करण्यास मिळाला नकार
4

पत्नीसह तुरुंगात असलेल्या विक्रम भट्ट यांना उच्च न्यायालयाकडून मोठा झटका, FIR रद्द करण्यास मिळाला नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.