
फोटो सौजन्य - JIO Cinema
बिग बॉस मराठी ५ : बिग बॉस मराठी सिझन ५ सुरु झाला आहे आणि त्याचा पहिला आठवडा संपला आहे. काल म्हणजेच ३ ऑगस्ट रोजी विकेंडच्या वॉर पार पडला. यावेळी रितेश देशमुखने घरातील स्पर्धांकांची शाळा घेतली आहे आणि आता या भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. त्याचबरोबर बिग बॉस मराठीचे चार सिझन मराठी दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी केले आहेत. त्यामुळे त्यांना प्रेक्षकांनी बिग बॉसचा होस्ट म्हणून भरभरून प्रेम दिले आणि कौतुक केले आहेत. त्यानंतर यंदा बिग बॉस मराठी सिझन ५ चा होस्ट बदलला आणि रितेश देशमुखची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्याच भागामध्ये त्याने चांगले होस्टिंग केले आहे अशा प्रेक्षकांचे म्हणणे आहे.
कालच्या भागामध्ये त्याने शोमधील स्पर्धक निक्की तांबोळीला रितेश देशमुखने चांगलचं फटकारलं आहे. आठवड्याच्या भागामध्ये एक वक्तव्य निक्की तांबोळीचे प्रचंड चर्चेत होते की, मी या शोमध्ये अशा प्रकारचे मेन्टॅलिटीची माणसं असणार आहेत म्हणून मी या शोमध्ये येत नव्हती. या वक्तव्यावर रितेश देशमुखने निक्की तांबोळीला फटकारले. यावेळी तो म्हणाला की, जर तुला या शोमध्ये अशा मेन्टॅलिटीची माणसं असणार होती तर मग कशाला या शोमध्ये आली. जर तुम्हाला मराठी माणसाची इज्जत नसेल तर तुम्हाला या शोमध्ये राहण्याची गरज नाही, तुम्हाला मराठी माणसाची माफी लागावी लागणार आहे असे रितेश देशमुख म्हणाला.
त्यानंतर निक्की तांबोळीने हात जोडून महाराष्ट्राची माफी मागितली आहे. त्यानंतर रितेशने बाकीच्या स्पर्धकांना सुद्धा त्याने त्याचे निगेटिव्ह आणि पॉसिटीव्ह मुद्दे समजावून सांगितले आहे. त्याचबरोबर त्याच्या या पहिल्या वीकेंडच्या वॉरला रितेश देशमुखने जे मुद्दे मांडले त्याचा या भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे.