
Amit and Riteish Deshmukh react to Ravindra Chavan statement regarding Vilasrao Deshmuk
Vilasrao Deshmukh : लातूर : राज्यामध्ये पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. भाजपेच श्रेष्ठी हे प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. चव्हाण हे लातूरमध्ये प्रचारासाठी गेले होते. मात्र यावेळी त्यांनी दिवंगत कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत वक्तव्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. विलासराव देशमुख यांच्या अडचणी 100 टक्के पुसल्या जाणार असे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केले. यामुळे विलासराव देशमुख यांचे पुत्र नाराज आणि आक्रमक झाले आहेत. रितेश देशमुख आणि अमित देशमुख यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले होते रवींद्र चव्हाण?
लातूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचार सभा घेतली. लातूर हे आजही विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. लातूरमध्ये रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांच्या आठवणी 100 टक्के पुसल्या जातील असे वक्तव्य केले. चव्हाण म्हणाले की, “लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय. हा उत्साह पाहून लक्षात येते की, लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी 100 टक्के पुसल्या जातील, यात कोणतीही शंका नाही”. असे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केले होते. यावरुन जोरदार टीका करण्यात आली. तसेच अभिनेता रितेश देशमुख आणि माजी मंत्री अमित देशमुख यांनी व्हिडिओ जारी करत नाराजी व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : रवींद्र चव्हाणांनी पत्रकार परिषद सोडली अर्धवट; विलासराव देशमुखांच्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी
अमित देशमुख यांचा आक्रमक पवित्रा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर आमदार अमित देशमुख म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येऊन जे विधान केलंय त्यावरून, हा पक्ष कुठल्या स्तरावर राजकारनालाघेऊन चालला आहे हे दिसून येत आहे. लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. त्यांच्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातूनही असाच निषेध होताना दिसत आहे. द्यमान राज्य सरकारच्या कार्यकाळात निवडणुकीच्या दरम्यान लोकांना धमकावणे, पैशाचे अमिष दाखवणे, एवढेच नव्हे तर उमेदवार पळवणे, त्यांच्या अपहरण करणे, खून , हिंसाचार घडवणे इथपर्यंतच्या घटना घडत आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी ओळख कधीच नव्हती, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राची ही नवी ओळख निर्माण करू पाहतो आहे का? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे,” असे अमित देशमुख म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का, मुंबईतील कट्टर मनसैनिकाने सोडली साथ
त्याचबरोबर अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख म्हणाले की, “लिहिलेले पुसता येतं, पण कोरलेलं नाही! दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावे मनावर कोरलेले असतात. लिहिलेले पुसता येतं, पण कोरलेलं नाही,” अशा शब्दात आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे. रितेश यांची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. रवींद्र चव्हाण यांनी लातूर इथं भाजप कार्यकर्ता मेळाव्यात, कार्यकर्त्याचा जोश पाहून शंभर टक्के लातूर शहरातून विलासरावांचे विचार पुसले जातील, असं विधान केलं होतं,” त्यानंतर राजकीय वाद उफाळला आहे.