Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सालबर्डी’तील ‘मंजुळा’ गाण्यात सोनाली कुलकर्णीचा हटके अंदाज; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

‘सालबर्डी’ या आगामी चित्रपटामध्ये ‘मंजुळा’ गाण्यातून सोनाली कुलकर्णीचा हटके आणि दमदार अंदाज पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 26, 2026 | 02:26 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘सालबर्डी’तील ‘मंजुळा’ गाणं प्रदर्शित
  • गाण्यात दिसली सोनाली कुलकर्णीची झलक
  • जाणून घ्या चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा आपल्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या सालबर्डी या चित्रपटातील ‘मंजुळा’ या धमाकेदार गाण्यातून सोनालीचा एक हटके आणि मनमोहक अंदाज पाहायला मिळणार आहे. या गाण्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून, प्रेक्षकांना एक भन्नाट व्हिज्युअल ट्रीट मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.

‘मंजुळा’ या आयटम साँगची कोरिओग्राफी प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी केली आहे. गाण्याच्या स्टेप्स आकर्षक आणि ऊर्जेने भरलेल्या असून त्या सोनालीच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी साजेशा आहेत. गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या या गाण्याला पद्मनाभ गायकवाड यांनी संगीत दिले आहे, तर आनंदी जोशी हिने आपल्या आवाजाने या गाण्याला खास रंगत आणली आहे. गाण्याची ऊर्जा, ठेका आणि सादरीकरण यामुळे ‘मंजुळा’ हे गाणं प्रेक्षकांच्या ओठावर राहील, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.

ट्रम्पसोबत ‘शांतता चर्चे’साठी बमन इराणी सज्ज; ‘सिलेंडर घेऊन दादरला या’ म्हणत शेअर केला मजेदार व्हिडिओ

चित्रपटाच्या निर्मितीबद्दल बोलायचे झाल्यास, अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी यापूर्वी ‘गुल्हर’, ‘बाबो’, ‘पाणीपुरी’ यांसारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिल्यानंतर आता ‘सालबर्डी’सारखा मल्टीस्टारर रहस्यमय थरारपट प्रेक्षकांसमोर आणला आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

या गाण्याबद्दल बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाली की, “हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. यामध्ये एक वेगळीच एनर्जी आहे. फुलवाने या गाण्यातून काहीतरी नवीन आणि एंटरटेनिंग देण्याचा प्रयत्न केला आहे, आणि ते प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.” सोनालीच्या या वक्तव्यामुळे गाण्याबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

निर्मात्यांनी जाहीर केली ‘नागबंधम’ची रिलीज डेट; पौराणिक भव्यतेने सजलेला बहुप्रतीक्षित पॅन इंडिया चित्रपट

‘सालबर्डी’ हा चित्रपट महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या एका गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांवर आधारित आहे. नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारलेला हा चित्रपट प्रेक्षकांना थरारक अनुभव देण्याचे आश्वासन देतो. चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर आणि कोमल चौधरी यांसारखी मोठी स्टारकास्ट चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

एकूणच आकर्षक कोरिओग्राफी, भन्नाट डान्स स्टेप्स आणि सोनाली कुलकर्णीची जबरदस्त एनर्जी यामुळे ‘मंजुळा’ हे गाणं प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. त्यामुळे ‘सालबर्डी’ हा चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी छाप पाडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Salbardi movie manjula song sonalee kulkarni dance release 17 april marathi film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Bollywood
  • marathi movie
  • sonalee kulkarni

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
3

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
4

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.