
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठीपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार लग्न करताना दिसत आहेत. आणि चाहत्यांना सुखात धक्का दिला आहे, आता अश्यातच मराठी अभिनेत्री आणि सुप्रसिद्ध गीतकार-कवी संदीप खरे यांची लेक रुमानी खरे हिने साखरपुडा केला आहे. तू तेव्हा तशी या मालिकेमध्ये अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसली आहे. आणि आता तिने अभिनेता स्तवन शिंदे याच्याशी साखरपुडा करून चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर केली आहे. या क्युट कपलने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘मेरे लाईफ मे हीरो की…’; ‘तुला पाहते रे’ अभिनेत्री Gayatri Datar चा साखरपुडा संपन्न, पहा Photos
रुमानी खरे आणि स्तवन शिंदे हिचा साखरपुडा नुकताच पार पडला. या साखरपुडा सोहळ्याचे फोटो आता समोर आले आहेत. ज्यामध्ये अनेक कलाकार देखील सहभागी होणार दिसले. मराठी सिनेइंडस्ट्रीतला अभिनेता स्तवन शिंदे याच्यासोबत रुमानी नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे. रुमानी आणि स्तवन यांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर , प्रार्थना बेहेरे यांनी या सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच चाहते देखील त्यांना शुभेच्छा देत आहेत.
कोण आहे संदीप खरे यांचा होणार जावईस्तवन शिंदे?
स्तवन शिंदेहा मराठी सिनेविश्वातला लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘तुमचं आमचं सेम असतं’ या मालिकेतून त्याने टीव्ही विश्वात पदार्पण केले. अमृता देशमुख आणि स्तवन शिंदे या दोघांचीही ही पहिलीच मालिका होती. यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. तर छोट्या पडद्यावरच्याच ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत तो झळकला. मालिकेत शिवा काशीद यांच्या पराक्रमाची गाथा दाखवण्यात आली होती. स्तवन शिंदेनं ही भूमिका साकारली होती. तर, रुमानीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. ‘तू तेव्हा तशी’ आणि ‘दुर्गा’ या मालिकेत अभिनेत्री दिसली आहे. तसेच ती मराठी नाटक देखील करत आहेत.