गायत्री दातारचा साखरपुडा (फोटो- instagram )
अभिनेत्री गायत्री दातारचा साखरपुडा संपन्न
फोटो शेअर करत दिली माहिती
‘तुला पाहते रे’ मालिकेत केले होते काम
Enterntainment News: अभिनेत्री गायत्री दातार ही प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने ‘तुला पाहते रे’ या मराठी मालिकेतून (Entertainment) प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्यासोबत काम केले होते. दरम्यान या मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. गायत्री दातार हिने साखरपुडा केल्याचे समोर आले आहे. लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. तिने सोशल मिडियावर पोस्ट करत ही बातमी दिली आहे.
मराठी मालिकांमध्ये काम करून लोकप्रिय झालेली अभिनेत्री गायत्री दातार हिने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने साखरपुडा केला आहे. अभिनेत्री गायत्री दातार हिने ‘मेरे लाईफ मे हीरो की एन्ट्री हो गाई हे’ असे शीर्षक देऊन सोशल मिडियावर फोटो पोस्ट केले आहेत.






