Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा होणार! नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी खास फोटो शेअर करून चाहत्यांना दिली गुडन्यूज!

मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर आणि त्याची पत्नी प्रियांका ढवळे दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 01, 2025 | 10:57 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकरने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याच्या सगळ्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या बातमीने अभिनेत्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. ही गुडन्यूज म्हणजे अभिनेता लवकरच पुन्हा एकदा बाबा होणार आहे. त्याची पत्नी प्रियांका ढवळे गरोदर असून हे जोडपं या नवीन वर्षात त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहे. पत्नी आणि अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून अभिनेत्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

चित्रपट, नाटक, मालिका, वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये अभिनेता शशांक केतकरने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या अभिनेता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शशांकची ४ डिसेंबर २०१७ मध्ये त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेबरोबर लग्न झाले. यानंतर शशांक आणि प्रियांका यांनी २०२१ मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आणि त्याचे आनंदाने स्वागत केले. अभिनेत्याच्या मोठ्या मुलाचं नाव ऋग्वेद आहे. आणि आता अभिनेत्याच्या आयुष्यात आणखी एका गोंडस बाळाचा प्रवेश होणार आहे. ऋग्वेद, शशांक आणि त्याची पत्नी प्रियांका या तिघांनी मिळून एकत्र मॅटर्निटी फोटोशूट देखील केले आहे. या तिघांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

Deva: शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाचे नवे पोस्टर लवकरच होणार रिलीज? अमिताभ बच्चन यांच्याशी खास कनेक्शन!

शशांक केतकर आणि प्रियांका पुन्हा होणार आई-बाबा
अभिनेता शशांकने ही पोस्ट शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “२०२५ चं स्वागत यापेक्षा छान बातमीनं होऊच शकत नाही. आम्ही पुन्हा एकदा आई-बाबा होणार, ऋग्वेद दादा होणार आणि आमचे आई बाबा पुन्हा एकदा आजी आजोबा होणार यासाठी आम्ही तयार आहोत.” असे लिहून अभिनेत्याने ही गोड बातमी शेअर केली आहे.

शशांक आणि प्रियांका आई-बाबा होणार असल्याचं समजताच मराठी कलाकारांनी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. रेश्मा शिंदे, तितिक्षा तावडे, तन्वी मुंडले, सुकन्या मोने, आशय कुलकर्णी, प्रियांका तेंडोलकर, सलील कुलकर्णी, अपूर्वा नेमळेकर या सगळ्या कलाकारांसह नेटकऱ्यांनी शशांकच्या पोस्टवर भरभरून कमेंट्स करत केतकर कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा बातमीने अभिनेत्याच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.

दरम्यान, शशांकच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, अभिनेता सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘मुरांबा’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेला प्रेक्षकांची सुद्धा चांगली पसंती मिळत आहे. शशांकसह या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर प्रमुख भूमिकेत झळकली आहे. तसेच ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे.

Web Title: Shashank ketkar shares good news he will become father for second time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • shashank ketkar

संबंधित बातम्या

Jyoti Chanderkar: कधी आणि कुठे होणार ज्योती चांदेरकर यांचे अंत्यसंस्कार? मुलगी तेजस्विनी पंडितने दिली माहिती
1

Jyoti Chanderkar: कधी आणि कुठे होणार ज्योती चांदेरकर यांचे अंत्यसंस्कार? मुलगी तेजस्विनी पंडितने दिली माहिती

Elvish Yadav: एल्विश यादवच्या राहत्या घरी गोळीबार, युट्यूबरच्या वडिलांनी दिली माहिती; म्हणाले ‘घराबाहेर… ‘
2

Elvish Yadav: एल्विश यादवच्या राहत्या घरी गोळीबार, युट्यूबरच्या वडिलांनी दिली माहिती; म्हणाले ‘घराबाहेर… ‘

Jyoti Chandekar: बालवयात रंगभूमीवर केले काम, 200 पुरस्कारांनी सन्मानित; अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे ‘हे’ गाजलेले चित्रपट
3

Jyoti Chandekar: बालवयात रंगभूमीवर केले काम, 200 पुरस्कारांनी सन्मानित; अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे ‘हे’ गाजलेले चित्रपट

FASTag Annual Pass ला भारतीयांचा उदंड प्रतिसाद! आता पर्यंत 1.4 लाख पास बुक
4

FASTag Annual Pass ला भारतीयांचा उदंड प्रतिसाद! आता पर्यंत 1.4 लाख पास बुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.