
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कीर्ती सुरेशने चिरंजीवीच्या चाहत्यांची मागितली माफी, एक वर्षाआधीचे प्रकरण आता का चिघळले?
2025 वर्षात अभिजीतने अनेक ट्विस्ट असलेली ट्रेंडिंग गाणी गायली आणि पुन्हा प्रेक्षकांना मोहित केलं आहे. चाल तुरु तुरू पासून नुकतंच प्रदर्शित झालेलं आय पॉपस्टार मधल मोहब्बते लुटाऊंगाच नवकोर जेन झी व्हर्जन असू दे कायम अभिजीतने त्याचा सदाबहार आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. अभिजीतने अनेक मराठी आणि हिंदी गाणी गायली आहेत, जी नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहेत.
आता गायक अभिजीत सावंत लवकरच “रुपेरी वाळूत” हे नवं कोर गाणं घेऊन येत आहे आणि गाण्यात त्याच्यासोबत गौतमी पाटील देखील वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. 5 डिसेंबरला हे गाणं प्रदर्शित होणार असून आता हे गाणं जुन्या गाण्याचा नवा ट्विस्ट असणार की अजून काही हे बघण्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे. सोशल मीडिया वरचा अभिजीत आणि गौतमी यांचे बीच वरचे फोटो व्हायरल होत असलेला AI व्हिडिओ आणि आज या गाण्याची झालेली घोषणा सगळचं बघण्यासाठी प्रेक्षक देखील तितकेच उत्सुक आहेत.
एल्विश यादवचे अभिनयात पदार्पण; ‘औकात से बहार’ या आगामी वेब सिरीजमध्ये साकारणार महत्वाची भूमिका
अभिजीतबद्दल बोलायचं झालं तर, अभिजीतने आजवर त्याचा आवाजाने आणि बिग बॉस मधल्या कमाल खेळीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे येणाऱ्या काळात देखील तो अनेक वैविध्यपूर्ण आणि कमाल प्रोजेक्ट्सचा भाग होणार आहे. इंडियन आयडॉल ते आजच्या पिढीला साजेशी ट्रेंडिंग गाणी देणारा तरुणाईचा लाडका गायक ठरला आहे. तसेच लोकप्रिय डान्सर आणि अभिनेत्री गौतमी पाटील नुकतीच नवनवीन मराठी चित्रपटामध्ये दिसली आहे. याशिवाय टेलिव्हिजनवरही तिने विविध कार्यक्रमामध्ये तिचे अभिनयकौशल्य दाखवले आहे. आता या दोघांना गाण्यामध्ये एकत्र पाहून चाहते खुश झाले आहेत.